नागपूर समाचार : संविधान बचाव आंदोलना तर्फे टिळक भवन येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. 69 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा निमित्ताने भव्य कार्यक्रमाचे आयोजन काचीपुरा चौक येथे करण्यात आले असून अशी माहिती एड. मिलिंद खोब्रागडे यांनी पत्रकारांना दिली.
बोधीसत्तव, परमपूज्य, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी, “अशोक विजया दशमी” चे अवचित्य साधून नागपूर स्थित पवित्र दीक्षाभूमी येथे स्वतःसह लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली व शांतीचा मार्ग स्वीकारून अहिंसक मार्गाने दीक्षा समारंभ मोठ्या उत्साहाने पार पडला. दि.१६ ऑक्टोबर १९५६ रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र बाँरि. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या आग्रहाने चंद्रपूर येथे लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण नंतर या दोन्ही स्थळांचे पावित्र्य कायम ठेवून देश विदेशातील लाखो अनुयायी येथे येऊन नतमस्तक होतात व या पवित्र दीक्षाभूमी (उर्जाभूमी) ची वैचारिक प्रेरणा घेतात.
वरील दोन्ही स्थळांचे महत्व लक्षात घेऊन संघटनेच्या वतीने गेल्या १३ वर्षापासून सातत्याने आम्ही भव्य कार्यक्रम घेऊन दीक्षा सोहळा साजरा करीत आहोत. तसेच दोन्ही स्थळावर येणाऱ्या सर्व अनुयायांना संघटनेतर्फे हार्दिक अभिनंदन करीत आहोत. त्यानुसार दि.२ ऑक्टोबर ला पवित्र दीक्षाभूमी नागपूर स्थित काचीपुरा येथे भव्य कार्यक्रम आयोजिले असून या कार्यक्रमा मध्ये, प्रबोधनात्मक, सांस्कृतिक भीम-बौद्ध गीतांचे गायन, गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार, महापुरुषांचे साहित्य (पुस्तके) वितरण तसेच भव्य भोजनाचा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
त्याच प्रमाणे दिनांक १५ व १६ ऑक्टोबर ला पवित्र दीक्षाभूमी परिसर चंद्रपूर येथे सुद्धा भव्य कार्यक्रम आयोजिले आहे. करिता, सर्व बौद्ध अनुयायांनी सदर कार्यक्रमा मध्ये आपण उपस्तीत राहण्याचे आग्रहाचे निमंत्रण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अँड. मिलिंद खोब्रागडे, उपाध्यक्ष मेघराज राऊत, महासचिव पपिता जुनघरे, कार्यक्रमाचे आयोजक गायक सुभाष कोठारे, धिरज निकाळजे, डॉ. भिमराव मेश्राम यांनी केले आहे.
पत्रपरिषदेत संविधान बचाव आंदोलन चे राष्ट्रीय अध्यक्ष एड. मिलिंद खोब्रागडे, मेघराज राऊत, धीरज निकाळजे, भीमराव मेश्राम, बी बी कोचे, महेंद्र सातपुते, राजू गायकवाड, बबलू कडबे, नामदेवराव निकोसे, सुरेश गाणार, राजेंद्र सोनटक्के, अशोक खोब्रागडे, सुखदेव मेश्राम, निकेश ढोके, संघर्ष डवले आदींची उपस्थिती होती.




