- Breaking News, नागपुर समाचार, मनपा

नागपुर : नागरिक, लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने नागपूरला ‘स्मार्ट’ करु : झलके

स्मार्ट सिटी स्टेक होल्डर्सची इंजीनियरिंग, आर्किटेक्चर कॉलेज सोबत बैठक

नागपूर : नागपूर स्मार्ट ॲड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कारपोरेशन लिमिटेडच्या वतीने स्टेक होर्ल्डस मीटचे श्रृंखले अंतर्गत शहरातील इंजीनियरिंग आणि आर्किटेक्चर कॉलेजचे प्रतिनिधीची सभा बुधवारी मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील स्मार्ट सिटीचे कॉन्फरन्स हॉल येथे आयोजित करण्यात आली होती. स्थायी समितीचे सभापती व स्मार्ट सिटीचे संचालक श्री.विजय (पिंटू) झलके सभेच्या अध्यक्षस्थानी होते. स्मार्ट सिटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रभारी) श्री. महेश मोरोणे बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होते. महापौर श्री. संदीप जोशी यांच्या पुढाकाराने स्टेक होर्ल्डसची मीटिंग घेण्यात येत आहे.

कॉलेजच्या प्रतिनिधिंना संबोधित करतांना श्री. विजय (पिंटू) झलके म्हणाले की, नागपूरचा विकास करण्यासाठी समाजाच्या सर्व घटकांनी सोबत येऊन सहकार्य करण्याची गरज आहे. नागपूर शहराला ‘लाईव्हली’, ‘सेफ’, ‘सस्टेनेबल’ व ‘हेल्दी’ शहर करण्याच्या दृष्टीने भरघोस मदत करण्याचे त्यांनी आवाहन केले. यावेळी त्यांनी १८ कि.मी. चे रस्त्यावर डेडीकेटेड बायसिकल लेन तयार करण्याचे स्मार्ट सिटीचे प्रस्तावाची प्रशंसा केली. ही व्यवस्था नागपूरच्या नागरिकांना निरोगी ठेवण्यासाठी उत्तम ठरेल, नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या सहकार्यांनी शहराचा विकास उत्तम पध्दतीने केल्या जाऊ शकतो, असेही त्यांनी सांगीतले. कार्यक्रमाचे आयोजन ई-गर्व्हनेंस, नियोजन विभागाचे वतीने करण्यात आले होते.

यापूर्वी सी.ई.ओ. (प्रभारी) श्री. महेश मोरोणे यांनी उपस्थित प्रतिनिधीसमोर स्मार्ट सिटीस्ज् मिशन अंतर्गत नागपूर शहरात राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांचे सादरीकरण केले. स्मार्ट सिटीस्ज् मिशन केंद्र शासनाचे गृह निर्माण व शहरी विकास मंत्रालयाने २०१५ मध्ये सुरु केले आहे. नागपूरचा देशातील १०० शहरांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यांनी सांगितले की, स्मार्ट सिटीस्ज् ‍मिशन अंतर्गत केंद्र शासनाने “इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज” हा उपक्रम सुरु केला आहे. हा कार्यक्रम तीन टप्प्यामध्ये राबविण्यात येणार आहे. प्रथम चरणामध्ये नागपूरात लहान-लहान उपाय करुन सायकलिंग ला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. सोबतच नागरिकांमध्ये वातावरण निमिर्ती करुन त्यांना रोजचे कामांसाठी सायकलचा वापर करण्यासाठी प्रवृत केले जात आहे. नागपूरात सायकल चालविण्या योग्य १८ कि.मी. रस्त्यांवरती डेडीकेटेड बायसिकल लेन तयार करण्यात येणार आहे. शहरातील जास्तीत-जास्त नागरिकांनी सायकलला प्राधान्य दयावे यासाठी उपाययोजना केल्या जात आहे.

या दृष्टिने नागपूर शहराने स्मार्ट ‍सिटीच्या माध्यमातून हॅन्डल बार सर्व्हे व्दारा एका आठवडयात १८ कि.मी. चे रस्ते सायकलिंग साठी ‍निश्चित केले व या रस्त्यांवर स्मार्ट सिटीचा एकही पैसा खर्च न करता सी.एस.आर. निधीतून दोन कोटी किंमतीचे काम करण्यात येणार आहे. नागपूरला सायकल कॅपिटल ऑफ इंडिया करण्याचा निर्धार स्मार्ट सिटी ने घेतला आहे, असे त्यांनी नमूद केले. सीताबर्डी ला व्हेहीकल फ्री झोन करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. त्यांनी सांगितले की नागपूर मध्ये 10 थिम पार्क विकसित करण्यात येणार आहे. यांच्यात हॅप्पी थॉट गार्डन व आर्ट गार्डन याचा प्रथम चरणात समावेश राहील. त्यांनी इंजीनियरिंग व आर्किटेक्चर कालेजच्या प्रतिनिधिंनी नागपूरचे रस्त्यावरील चौकाच्या डिझाइनमध्ये सुधारणा करावी तसेच महाविद्यालयाच्या माध्यमातून प्रदूषणरहीत वाहनांना प्रोत्साहीत करावे, बायसीकल क्लब उघडावे, असे त्यांनी सुचविले.

बैठकीला उपस्थित एल.इ.डी.कॉलेज आर्किटेक्चर विभागाच्या प्राचार्य श्रीमती डॉ. उज्वला चक्रदेव यांनी आर्किटेक्चर कालेजच्या विद्यार्थ्यांकडून सर्वोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देत विद्यार्थ्यांसमवेत बैठक घेण्याचे सुचविले. जे.आय.टी.कालेजचे श्री. अनिल बावस्कर यांनी आपल्या कालेजांचे विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेले प्रकल्पाबददल सांगितले. प्रियदर्शनी कॉलेज चे किशोर रेवतकर यांनी नागपूरचा विकासात सगळयांना सोबत घेण्याचा सल्ला दिला. रायसोनी कॉलेजचे डॉ. प्रमोद वाल्के, आईडियाज कॉलेजचे डॉ. केतन किम्मतकर आणि व्ही.एन.आई.टी.चे प्रो. समीर देशकर यांनीसुध्दा बहुमोल सूचना केल्या. आई.आई.आई.टी नागपूरचे डॉ. पूजा जैन, आईडियाज कॉलेज चे हर्ष नागपूरकर, प्रो. अजय ताम्हणे सुध्दा बैठकीला उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विधि अधिकारी मनजीत नेवारे यांनी केले. आभार कंपनी सेक्रेटरी श्रीमती भानुप्रिया ठाकूर यांनी मानले.

स्मार्ट सिटीचे वित्त अधिकारी नेहा झा, डॉ. शील घुले, डॉ. प्रणिता उमरेडकर, अमृता देशकर, सोनाली गेडाम, अनूप लाहोटी, आरती चौधरी, कुणाल गजभिये, बायसिकल मेयर दीपांती पाल, मानस व आरजूलता आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *