नागपूर समाचार : भाजपा आध्यात्मिक आघाडी नागपूर महानगर द्वारे सेवा पखवाडा अंतर्गत भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्य काल बुधवारी तीर्थक्षेत्र श्री कल्याणेश्वर मंदिर, महाल येथे भाजपाशहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी आणि आमदार प्रवीण दटके यांचे नेतृत्वात महाल केलिबाग रोड परिसरात स्वच्छता अभियान संपन्न करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घ आयुरोग्यासाठी आणि ऑपरेशन सिंदूर च्या तमाम शहीद देशभक्त बांधवांच्या स्मरणार्थ दयाशंकर तिवारी यांच्या विशेष उपस्थितीत श्री कल्याणेश्वर शिवलिंगाचे पूजन – अभिषेक आणि महाआरती चा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. तसेच याप्रसंगी मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके, यांनी पदाधिकारी यांचे समवेत कल्याणेश्वर परिसरात स्वच्छता अभियान केले.
यावेळी माजी महापौर अर्चना डेहनकर, शहर महामंत्री श्रीकांत आगलावे, महाल मंडळ अध्यक्ष अनिल मानापुरे, आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष डॉ श्रीरंग वराडपांडे, सुजाता कठोते, सपना सागुळले, महामंत्री धीरज चव्हाण, पंकज साळुंके, डॉ सुभाष राऊत, सोमुजी देशपांडे, अभिजीत काथळे, मकरंद भालेराव, आणि आदी समस्त पदाधिकारी उपस्थित होते. हा कार्यक्रम भाजपा आध्यात्मिक आघाडी नागपूर महानगरच्या वतीने आयोजित करण्यात आलेला असून शेवटी महा आरती व प्रसाद वितरित करण्यात आला.




