नागपुर समाचार : मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईत 29 ऑगस्ट पासून आंदोलन सुरू केले आहे. त्याविरोधात मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत ओबीसी मधून आरक्षण सरकारने देऊ नये यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने 30 ऑगस्ट पासून नागपूर येथील संविधान चौकात बेमुदत साखळी उपोषण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे याचे प्रमुख उपस्थितीत सुरू केले आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. यापूर्वी 2023 मध्ये महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत ओबीसी मधून आरक्षण दिले जाणार नाही असे लिखित दिले होते. पुन्हा एकदा शासनाने राष्ट्रीय ओबीसी महासंघाला मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देणार नाही असे लिखित देऊन महासंघाला आश्वस्त करावे तोपर्यंत महासंघाचे साखळी उपोषण सुरूच राहणार आहे.
आज 30 ऑगस्ट रोजी संविधान चौकात सुरू झालेल्या साखळी उपोषणात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नामदेवराव भुयारकर, राजाभाऊ चिलाटे, गणेश नाखले,राजेंद्र काकडे, वसंतराव राऊत, हेमंत गावंडे, केशव शास्त्री, लहू राक्षे हिंगोली, चंद्रकांत हिंगे, राजू गोस्वामी, रंगराव गेचोडे इत्यादींचा सहभाग आहे.
आज या साखळी उपोषणाला आमदार अभिजीत वंजारी , आमदार प्रवीण दटके, गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार अशोक नेते, माजी नगरसेवक रमेश भुरसे, प्रकाश गेडाम, माजी नगरसेवक रमेश शिंगारे, गडचिरोली जिल्ह्याचे सहकार नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार, डॉ अशोक जीवतोडे,वीरेंद्र गोतमारे,प्राचार्य भुषण चिकटे, विकास गौर, शंकर मौर्य सतीश इटकेलवार, माजी नगरसेवक नाना झोडे , भरतराव केंद्रे बीड, विनोद इंगोले, गडचिरोलीचे माजी भाजप जिल्हाध्यक्ष तथा ओबीसी नेते प्रशांत वाघरे, भास्कर बुरे, अनिल पोहनकर, रत्नदीप म्हशाखेत्री, गणेश दहेलकर , भाविक आभारे, शेषराव कोहळे आकाश सातपुते, विलास भांडेकर वडसा येथील महेश झरकर, सुनिल पारधी, वसंतराव दोनाडकर हिरालाल शेंडे कैलास पारधी, रोशन ठाकरे नेताजी तुपट, शंकर पारधी, दीपक प्रधान, गोपाल दरवे, आदित्य मिसार, ॲड राजू शेंडे,विजय आगलावे,सतीश तांबे, तुकाराम धोबे, एडवोकेट अभिजीत जीकार, आरीफ हुमायु आदीनी उपोषण मंडपाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
या उपोषणाला तिरळे कुणबी समाज, तेली समाज संघटना तसेच रिपब्लिकन आठवले गटाने पाठिंबा दिला आहे., ओबीसी समाज संघटना नागभिड, ओबीसी संघर्ष समिती गोंदिया,चे बबलु कटरे, सोनार सेवा संघाचे पदाधिकारी अशोक कर्हे, यांनी पाठिंबा दर्शवला.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या प्रमुख मागन्या
1 मराठा जातीचा ओबीसी संवर्गात समावेश करण्यात येऊ नये तसेच सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये
2 अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी
3 ओबीसी मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रमात शंभर टक्के शिष्यवृत्ती लागू करण्यात यावी
4 परदेशी शिष्यवृत्तीसाठी 75 विद्यार्थ्यांची संख्या वाढवून 200 विद्यार्थी करण्यात यावी
5. महा ज्योती या संस्थेकरिता एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी
6. माडा व सिडको तर्फे बांधून देण्यात येणाऱ्या घरकुल योजनेत ओबीसींना आरक्षण लागू करण्यात यावे
7. नागपूर येथे तयार असलेले उच्च व तंत्र विभागाचे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त बांधलेले 200 मुलींचे तयार वस्तीगृह तसेच नागपूर येथे स्वर्गीय वसंतराव नाईक जन्मशताब्दी वर्षानिमित्त तयार असलेले 200 मुलांचे वस्तीगृह ओबीसी, व्ही जे,एनटी,एसबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहासाठी ओबीसी बहुजन कल्याण विभागाकडे हस्तांतरित करण्यात यावे.
8 ओबीसी विजा, भज व विमाप्र समुदायातील पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांची तीन वर्षापासून प्रलंबित असणारी फेलोशि त्वरित अदा करण्यात यावी या मागण्यासह 14 मागण्या महाराष्ट्र शासनाला करण्यात आल्या आहेत.
या आंदोलनासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रा शेषराव येलेकर, केंद्रीय सहसचीव शरद वानखेडे,कोषाध्यक्ष गुणेश्वर आरीकर, शहराध्यक्ष परमेश्वर राऊत, शकील पटेल, निखिल भुते, नाना झोडे,, वृषभ राऊत, राहुल करांगळे, रीतेश कढव, निलेश कोढे, दीपक कारेमोरे, कवडू लोहकरे, श्रीकांत मसमारे आदीचे सहकार्य लाभले.