- Breaking News, मुंबई समाचार

मुंबई समाचार : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी विविध देशांच्या महावाणिज्य दूतांनी घेतले गणेश दर्शन, मनोभावे आरतीही केली

मुंबई समाचार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी विविध देशातील महावाणिज्य दूतांनी गणेशाचे दर्शन घेत मनोभावे आरती केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांनी सर्व महावाणिज्य दूतांचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांसोबत सुमारे ३५ महावाणिज्य दूतांनी सहकुटुंब आरतीत सहभाग घेतला.

फ्रान्सचे जीन मारे सेरे चार्लेट, ब्रिटीश उच्चायुक्तालयाचे राजकीय प्रमुख जॉन निकेल, मलेशियाचे अहमद झुवारी युसूफ, साउथ कोरियाचे डाँगवान यू, ब्राझिलचे जाओ दे मेंडोन्का लिमा नेतो, बांग्लादेशच्या फरहाना अहमद चौधरी, इंडोनेशियाचे इडी वॉरडोयो, यूएईचे अब्दुल्ला हुसेन अल्मारझुकी, अर्जेंटिनाचे डॅनिअल क्यूर कन्फलोनिरी, श्रीलंकेचे प्रियंगा विक्रमसिंघे, इजिप्तचे दहिला तवाकोल, फिनलंडच्या इवा निल्सन, पोलंडचे थोमाझ, कतारचे अहमद साद अल सुलैती, मॉरिशसचे दुशांत बक्तोवार, इसराईलचे कोब्बी शोशनी, जपानचे कोजी यागी, युएसएचे मायकेल स्क्रेन्डर, टर्कीचे मुस्तफा केमालटीन युगूर, पनामाचे रॉर्बटो रॉड्रिग्ज प्रडा, इराकचे झुहायर साद अब्बास, कुवेतचे शाये अबू शायबा, ऑस्ट्रेलियाचे पौल मुर्फी, आर्यलँडचे टॉम नूनन, नेदरलँडचे नाबील तौती, बेलारूसचे अलिकसंदर मत्सूको, स्पेनचे जॉर्ज डी लुकास कॅडेनास, थायलंडच्या थितीपॉर्न चुचीन्नावट, स्वीडनचे उपमहावाणिज्य दूत जोकीम गुन्नारसन, स्विर्झलँडचे मॅथिअस कोएग्ल, सौदी अरेबियाचे सुलेमान ईद अलोतैबी, इटलीचे वॉल्टर फेरारा, मेक्सिकोच्या अड्रिना विल्लानेवा, चीनचे क्वीन जी, जर्मनीचे क्रिस्टोफ रेंडटॉर्फ, सिंगापूरचे जेरम वाँग, बहरिनचे अली अब्दुल अझीज अल बलुशी यांच्यासह अफगाणिस्तानचे महावाणिज्य दूत यांनी सहकुटुंब आरतीत सहभाग घेतला.

गणेश दर्शन, आरतीनंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी सर्वांची वैयक्तिक विचारपूस करीत चर्चा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *