- Breaking News, उत्सव, धार्मिक , नागपुर समाचार

नागपुर समाचार : श्री गणेश मंदिर टेकडी तर्फे गणेशोत्सव निमित्त सजावट व आकर्षक विद्युत रोषणाई

नागपूर समाचार : श्री गणेश मंदिर टेकडी नागपूर हे नागपूर वासीयांचे आराध्य दैवत असून विदर्भातील अष्टविनायका पैकी एक पौराणीक श्रध्दास्थान आहे. श्री गणेश उत्सवा निमीत्य कार्यकारीणी मंडळातर्फे भव्य तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भक्तांना कोणतीही गैर सोई होणार नाही याची विशेष दक्षता घेण्यात आली आहे. कार्यकारिणी मंडळ ह्यांच्या विद्यमाने गणेशोत्सव निमित्त 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 श्री गणेशोत्सवा निमित्य दहा दिवस दुपारी 1 ते 4 पर्यंत प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच हयावर्षी गणेशोत्सवात पंकज अग्रवाल यांच्या तर्फे “श्री” ना विशेष आकर्षक सजावट संस्थेतर्फे करण्यात आली आहे.

भक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मंदिरात पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयाद्वारे प्राप्त सूचने प्रमाणे 55 सी.सी.टी.व्ही कॅमेरे लावण्यात आले असून पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या संधीचा लाभ जास्तीत जास्त गणेश भक्तांना व्हावा याकरीता भक्तांकरीता सकाळी 4.30 ते रात्री 11 पर्यंत दर्शनाकरीता मंदिर सुरू ठेवले आहे व यु.सी.एन केबलद्वारे ऑनलाईन दर्शनाची सुविधा देखील करण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती गणेश मंदिर टेकडीच्या कार्यकारीणी मंडळाने केली आहे.

भक्तांना विनंती आहे की, मंदिर परीसरात सौंदर्याकरणाचे कार्य सुरू असल्यामुळे भक्तांनी आपली सर्व प्रकारची वाहने समोरील मॉडेल हायस्कूल येथे निःशुल्क पार्कीग करावित.भक्तांना सुचित करण्यात येते की, गणेशोत्सवा निमित्य 10 दिवस वाहन पूजा बंद ठेवण्यात आली आहे कृपया नोंद घ्यावी. तसेच भक्तांनी वाटप करण्यासाठी आणलेला प्रसाद समोरील शाळेच्या प्रांगणात नियोजित जागेवरच वाटप करावा. मंदिराच्या प्रांगणात प्रसाद वाटप होणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच वयोवृध्द भक्त व अपंगत्व असलेल्या भक्तांसाठी व्हील चेयरची व्यवस्था देखील मंदिरातर्फे करण्यात आली आहे. भक्तांना आग्रहाची विनंती आहे की, दर्शन सुलभतेने व्हावे हयादृष्टीने शक्योतर पूजा साहीत्य आणू नये. तसेच सिताबर्डी पोलीसांतर्फे सुरक्षिततेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त 10 दिवस करण्यात आला आहे. टेकडी गणेश मंदिरात हयावर्षी भक्तांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यांत येत आहे.

मंदिरात येणा-या सर्व वाहनांना मानस चौकाकडून मंदिराकडे येता येईल. तसेच पार्कीग ची व्यवस्था मॉडेल हायस्कूल च्या प्रांगणात केली आहे. भक्तांनी कृपया आपली दुचाकी व चार चाकी वाहने नियोजित जागेवरच ठेवून संस्थेच्या व्यवस्थेला सहकार्य करावे. अन्यथा वाहतूक विभागाकडून पुढील कारवाई केल्या जाईल कृपया याची नोंद घ्यावी. आपल्या सुरक्षितेच्या सूचना वाहतूक विभागाकडून दिल्या जातील. त्या सूचनांचे पालन आपण केल्यास आपले दर्शन सुरक्षितपणे होईल.

कार्यकारीणी मंडळाचे अध्यक्ष श्रीराम बी. कुळकर्णी, उपाध्यक्ष अरूण जी. व्यास, सचिव दिलीप एम शहाकार, सहसचिव सुनिल एस. अग्निहोत्री, कोषाध्यक्ष हरी लक्ष्मण भालेराव, विश्वस्त अरूण डी. कुळकर्णी, हयांनी सर्व भक्तांना दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. गणेशोत्सवात 10 दिवसात होणा-या स्पर्धेचे वेळापत्रक सूचना फलकावर लावण्यात येईल याची भक्तांनी नोंद घ्यावी. असे दिलीप एम. शहाकार (सचिव) श्री गणेश मंदिर टेकडी, नागपूर यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *