- Breaking News, कोविड-19, नागपुर समाचार, मनपा

नागपुर : ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ जनजागृती रथाला हिरवी झेंडी

‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ जनजागृती रथाला हिरवी झेंडी

नागपूर : केन्द्र शासन व राज्य शासनाच्या वतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात जनजागृती करण्यात येत आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून आज निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी आणि आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायसवाल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ जनजागृती रथाला हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला. उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलेकार उपस्थित होते.

या पथकाव्दारे जिल्हाभर फिरून नागरिकांची जनजागृती करण्यात येणार आहे. ‘कोरोनावर मात करण्यासाठी कधीच विसरू नका एसएमएस’ या घोषवाक्याद्वारे ही मोहीम राबविली जात आहे. एसएमएस म्हणजे सुरक्षित अंतर ठेवा, मास्क वापरा, आणि सँनिटायझरने वेळोवेळी हात धुवा या त्रिसूत्रीचा वापर करण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.

या मोहिमेच्या माध्यमातून नागपूरमधील कोविड- 19 संबंधी महत्त्वाचे हेल्पलाईन नंबर पोहचविण्यात येत आहेत. त्यामध्ये कोरोना हेल्पलाइन 18002333764, नागपूर मनपा हेल्पलाइन 0712-2567021 /2551866, कोरोना डेस्क 91-11-23978046, बेड उपलब्धता 0712-2545473 /2532474 आणि बिल तक्रार 9607601133 नागरिक कोरोनाबाधितांवर वेळेत निदान व उपचार आणि बिलासंदर्भातील तक्रारीसाठी संपर्क साधू शकणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *