माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे व माजी खा. प्रा. जोगेंद कवाडे सर यांची प्रमुख उपस्थिती
कामठी समाचार : नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरातील फुड कोर्ट येथे हल्दीराम शाखेचा व आउटलेटचा शुभारंभ करण्यात आला. रक्षाबंधन व स्वातंत्र दिनाच्या शुभ प्रसंगी आंतरराष्ट्रीय स्तरावर विख्यात ड्रॅगन पॅलेस परिसरात असलेल्या भव्य दिव्य अश्या फुड कोर्ट मध्ये हल्दीराम आऊटलेटचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे वित, नियोजन, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, हल्दीराम चे प्रमुख शिवकिशन अग्रवाल,माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे, ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या प्रमुख व माजी राज्यमंत्री मा.ॲड. सुलेखाताई कुंभारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
गेल्या अनेक वर्षापासुन मोठ्या प्रमाणात ड्रॅगन पॅलेसला लाखो पर्यटक भेट देतात. येथे भेट देणा-या लोकांकरिता कोणत्याही अल्पोहाराची सोय उपलब्ध नव्हती. ती आता हल्दीरामच्या माध्यमातुन पूर्ण होत आहे तसेच कामठी शहरातील लोकांना सुध्दा हल्दीरामची प्रतीक्षा होती आंतरराष्ट्रीय स्तरावर विख्यात हल्दीराम आऊटलेट कामठी शहरात नव्हते. आज याठिकाणी हल्दीराम आऊटलेटचे उद्घाटन झाल्याने आजूबाजूच्या काँलेज च्या विद्यार्थ्यांना ही येथे वेगवेगळ्या मिठाई व स्नैक्स (नाश्ता) व साऊथ इंडियन डिशेश सुद्धा इथे उपलब्ध होणार याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
जगप्रसिध्द असलेले हल्दीराम आता कामठी शहरात आल्याने येथील नागरिकांना हल्दीरामची सेवा कामठी वासियांना मिळणार याचे माजी राज्यमंत्री अँड. सुलेखाताई कुंभारे यांनी समाधान व्यक्त करित हल्दीराम कंपनीचे आभार मानले. दि. 9 ऑगस्ट 2025 रोजी असलेले रक्षाबंधन व 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र दिनाचे औचित्य साधुन तसेच पुढील महिन्यापासुन येणारे अनेक सणं लक्षात घेता ड्रैगन पॅलेस टेम्पल या महत्त्वपूर्ण ठिकाणी हल्दीराम ची कामठी येथे शाखा उघडल्याचे समाधान हल्दीराम चे प्रमुख शिवकिशन अग्रवाल यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी बोलतांना राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केले की जगविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या सानिध्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर विख्यात हल्दीराम आऊटलेटचे माझ्या हातुन उद्घाटन होणे हे माझे सौभाग्य आहे. सुलेखाताई कुंभारे ह्या माझ्या मोठ्या ताई असुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली कामठी शहराला मोठ्या प्रमाणात विकास सुरु आहे. कामठी शहराला ड्रॅगन पॅलेस टेम्पल ने पर्यटनाचे वैभव मिळवुन दिले. आमच्या रामटेक मध्ये सुद्धा अजूनही हल्दीराम आऊटलेट आल नाही. रामटेक वरुन आमचे रामटेक वासी कामठी तुन हल्दीरामची मिठाई घेऊन जातील. जगातील कोणताही कोना सुटणार नाही त्याठिकाणी हल्दीराम पोहोचेल अशा शुभेच्छा मी देतो असे राज्यमंत्री अँड. आशिष जयस्वाल यांनी यावेळी सांगितले. यावेळी हल्दीराम उद्योगाचे प्रमुख शिवकिशन अग्रवाल यांनी जगविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी शेकडोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.