- Breaking News, नागपुर समाचार, मनपा

नागपूर समाचार : शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील हेरीटेज वृक्षांना वाचवा मनपा आयुक्त डॉ. चौधरी यांचे निर्देश

नागपूर समाचार : सक्करदरा येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयाच्या नवीन इमारतीकरिता अडथळे ठरणाऱ्या वृक्षांच्या कपातीची परवानगी मागण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मंगळवारी (ता.५) या परिसराची पाहणी केली. पाहणीदरम्यान मनपा आयुक्त डॉ. चौधरी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि मनपाच्या उद्यान विभागाला बांधकाम करताना पुरातन वृक्ष वाचविण्यासह आवश्यक त्या वृक्षांचे पुनर्रोपण करून, पर्याय म्हणून नवीन झाडे लावण्याचे निर्देश ही दिले.

याप्रसंगी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी., उद्यान विभागाचे उपायुक्त गणेश राठोड, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सोनकर, यांचासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वर्ष घुसे व इतर अधिकारी उपस्थित होते.

सक्करदरा येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयाचे सन १९६५ मध्ये बांधकाम करण्यात आले होते. आता राज्य शासनाने नवीन रुग्णालय आणि महाविद्यालयासाठी निधी मंजूर केली आहे. यामुळे महविद्यालयात स्नातक अभ्यासक्रमाची क्षमता १०० वरून २०० इतकी तर स्नातकोत्तर अभ्यासक्रमासाठीची क्षमता १०० इतकी होणार आहे. महाविद्यालयाची नवीन इमारत सात माळ्याची असणार आहे. तर रुग्णायलयाच्या खाटांचा संख्येतही वाढ होऊन ३६४ खाट इतके होणार आहेत. १५ एकर जागेमध्ये पसरलेल्या या महाविद्यालयाला २८ हेरिटेज आणि ३९२ नॉन हेरिटेज वृक्ष कापण्याची परवानगी हवी आहे. आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली, यावेळी संबंधित विभागांना हेरीटेज वृक्ष वाचविण्याचे निर्देश दिले.

पाहणीदरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अतुल गोटे, वास्तुशिल्पकार ओंकार मोगरकर, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयचे डॉ. मनीष भोयर, डॉ मनोज शामकुवर, डॉ नीता केदार, डॉ अविनाश देशपांडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *