- Breaking News, नागपुर समाचार, शिक्षा

नागपूर समाचार : NEET UG 2025 – नागपूरच्या शाश्वत कुत्तरमारेने AIR 897 पटकावली

आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) चे आणखी 55 विद्यार्थीही टॉप यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये

नागपूर समाचार : देशातील आघाडीची टेस्ट प्रिपरेशन संस्था आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) यांना आनंद आहे की त्यांच्या नागपूर शाखेतील ५६ विद्यार्थ्यांनी NEET UG 2025 या अत्यंत स्पर्धात्मक वैद्यकीय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ही कामगिरी विद्यार्थ्यांच्या समर्पण, शैक्षणिक शिस्त आणि AESL च्या दर्जेदार मार्गदर्शन व प्रशिक्षणाचे प्रमाण आहे. ही निकाल आज नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने अधिकृतपणे जाहीर केले.

AESL नागपूर शाखेच्या विद्यार्थ्यांनी NEET UG 2025 मध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे. शाश्वत कुत्तरमारेने ऑल इंडिया रँक (AIR) 897 मिळवली, त्याचबरोबर समीद मोहम्मद साजिद (AIR 1514), अनुभव सुधीर सिंह (AIR 2609), मृणाल जाधव (AIR 2936), आयुष गजबिये (AIR 3274), अथर्व देव सिंह (AIR 4175), अनीश डागर (AIR 4786), श्रेयस जाधव (AIR 6213), ध्रुव गवांडे (AIR 6443), नैंसी प्रसाद (AIR 6503) आणि जिया अमरानी (AIR 7010) यांनीही उल्लेखनीय यश मिळवले, जे नागपूर केंद्राच्या शैक्षणिक गुणवत्तेचे आणि शिक्षणातल्या निष्ठेचे दर्शन घडवते.

हे सर्व विद्यार्थी AESL च्या क्लासरूम प्रोग्रामचे भाग होते, जो NEET सारख्या कठीण वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी विशेष तयार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय AESL ने दिलेल्या भक्कम शैक्षणिक पाया, संकल्पनांची स्पष्टता आणि सातत्यपूर्ण व शिस्तबद्ध अभ्यासक्रमाला दिले.

“या संपूर्ण प्रवासात मार्गदर्शन केल्याबद्दल मी आकाशचा अत्यंत आभारी आहे. संरचित अभ्यासक्रम, तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन आणि वैयक्तिक मेंटरिंगमुळे मला अवघड विषय थोड्या वेळात आत्मसात करता आले. AESL नसते, तर हे यश शक्य झाले नसते,” असे विद्यार्थ्याने सांगितले.

AESL चे चीफ अकॅडेमिक आणि बिझनेस हेड डॉ. एच. आर. राव यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले, “NEET UG 2025 मध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी केलेली उज्वल कामगिरी पाहून आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो. एवढ्या मोठ्या स्पर्धेत देशभरातून लाखो विद्यार्थी सहभागी होतात, आणि त्या स्पर्धेतून हे यश मिळवणे नक्कीच कौतुकास्पद आहे. या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचा पाठिंबा आणि आमच्या शिक्षकांचे समर्पण आहे. आम्ही त्यांना त्यांच्या वैद्यकीय करिअरमध्ये उत्तम यशाच्या शुभेच्छा देतो.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *