- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर : ऑक्सीमित्र अभियानांतर्गत आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते साधणार जनतेशी थेट संवाद

नागपूर : ऑक्सीमीटर मुळे लोकांचा अनमोल जीव वाचू शकतो असा संदेश दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या अनुभवातून दिला आहे. कोविड महामारीच्या सुरवातील दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर होती.

परंतु दिल्ली सरकार कडून अनेक नवनवे प्रयोग करण्यात आलेत. त्यामध्ये प्लाज्मा थेरपी असेल किंवा ऑक्सीमीटर च्या माध्यमातून होम कोरणटाईन्स असेल ह्या यशस्वी प्रयोगामुळे दिल्लीतील महामारीवर नियंत्रण आणता आले. हे दिल्ली पुरते मर्यादित न राहता या माध्यामतून संपूर्ण देशातील जनतेमध्ये जनजागृती निर्माण होऊ शकते, यासाठी राष्ट्रव्यापी ऑक्सीमित्र अभियान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ह्यांच्या द्वारे सुरू केले गेलेले आहे. त्यांनी पार्टी कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन सर्व सामान्य जनतेची ऑक्सीजन लेव्हल तपासण्याचे महत्व पटवून दिले आहे.

याच राष्ट्रव्यापी अभियानाचा भाग म्हणून नागपूर मध्ये आम आदमी पार्टी चे ऑक्सीमित्र घरोघरी जाऊन कोरोना जागरूकता अभियान राबवित्यांना नागरिकांबरोबर थेट संपर्क आणि संवाद साधणार आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *