नागपूर समाचार : श्री गणेश मंदिर टेकडी नागपूर हे नागपूर वासीयांचे आराध्य दैवत असून विदर्भातील अष्टविनायका पैकी एक पौराणीक श्रध्दास्थान आहे. श्री गणेश उत्सवानिमीत्य कार्यकारीणी मंडळातर्फे भव्य तयारी करण्यात आली आहे. “श्री” च्या गाभा-यातील सजावट पंकज अग्रवाल यांनी केली आहे. विशेष म्हणजे भक्तांना दर्शनाकरीता कोणतेही गैरसोई होणार नाही याची विशेष दक्षता घेण्यात आली आहे.
श्री गणेश चतुर्थी निमित्य दहा दिवस महाप्रसादाचे आयोजन देवेंद्र दहेरिया यांच्या तर्फे करण्यात आली आहे. तसेच हयावर्षी गणेशोत्सवात आकर्षक विद्युत रोषनाई सुनिल इलेक्ट्रीकल्स् ओमनगर सक्करदरा नागपूर, यांच्याद्वारे करण्यात आली आहे. भक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मंदिरात पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयाद्वारे प्राप्त सूचने प्रमाणे 40 सी. सी. टी.व्ही कॅमेरे लावण्यात आले असून पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भक्तांकरीता निःशुल्क वाहन पार्कीगची व्यवस्था मॉडेल हायस्कूल येथे करण्यात आली आहे व निःशुल्क चप्पल जोडा स्टॅन्ड ची व्यवस्था मंदिरातील मार्बल गेट जवळ करण्यात आली आहे.
तरी जास्तीत जास्त संख्येने भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष विकास ए लिमये, सहसचिव अरूण व्यास, कुळकर्णी, शांतीकुमार शर्मा, उपाध्यक्ष माधव कोहळे, सचिव एस.बी. कुळकर्णी, कोषाध्यक्ष दिलीप शहाकार, विश्वस्त अरूण डी. के.सी. गांधी, लखीचंद ढोबळे, संजय एस.जोगळेकर, हरी लक्ष्मण भालेराव ह्यांनी असे आवाहन केले आहे.




