- Breaking News, धार्मिक , नागपुर समाचार

नागपुर समाचार : सत्य सनातनी सेने तर्फे नागपुरात पहिल्यांदा भगवा स्ट्रीट जल्लोष

सत्य सनातनी सेने च्यावतीने भगवा स्ट्रीट 14 जुलै रोजी रविवारी या शुभदिनी पार पडला

◾नागपूर होणार सोन्याची जेजुरी; पंढरीची वारी जेजुरीच्या दारी

नागपुर समाचार : नागपूर येथील लक्ष्मीनारायण मंदिर सक्करधरा तलाव परिसरात भगवा स्ट्रीट हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात राबविण्यात आला. त्यावेळी प्रत्यक्षात खंडोबा महाराजांच्या आगमनाने भंडारा उधळून तो परिसर सोन्याचे जेजुरी म्हणून दुमदुमला. सोबतच बाहुबली हनुमानजी आगमना नंतर हनुमान चालीसा पठण झाले.

ढोल ताशाच्या गजरात पंढरीची वारी जेजुरीच्या दारी गेली. या कार्यक्रमाचा पहिला टप्पा असून असेच सांस्कृतिक (देव, देश, धार्मिक) कार्यक्रम सत्य सनातनी सेने द्वारा पुढे घेतले जातील.