- Breaking News, आंदोलन, नागपुर समाचार

कन्हान समाचार : बोरडा निमखेडा सिमेंट रस्त्याच्या कामात दिरंगाईने त्रस्त नागरिकांचे आंदोलन

खासदार बर्वे घटनास्थळी पोहचुन अधिकारी व कंत्राटदारास त्वरित काम करण्यास बजावले.

कन्हान समाचार :- बोरडा निमखेडा सिमेंट रस्त्याचे काम मागिल कित्येक वर्षापासुन कासव गतीने सुरू असुन पावसाळा सुरू झाल्याने स्त्यावरिल खडयात पाणी साचुन चिखलातुन नागरिकांना ये-जा करताना भयंकर त्रास सहन करावा लागत असल्याने बोरडा, निमखेडा, बोरी(राणी) येथिल नागरिकांच्या आंदोलनस्थळी खास दार श्यामकुमार बर्वे हयानी पोहचुन संबधित अधिका री व कंत्राटदारास त्वरित काम पुर्ण करण्यास बजाव ल्याने रस्त्याचे काम वेगाने सुरू करण्यात आल्याने आंदोलन यशस्वि झाल्याने गावक-यानी हर्ष व्यकत केला.

नागपुर जबलपुर राष्ट्रीय सिमेंट चारपदरी रस्त्या वरील नेहरू दवाखाना कांद्री पासुन नगरधन मार्गे रामटेक कडे जाणा-या रस्त्याचे गोंडेगाव पुनर्वसन वसाहती पासुन बोरडा निमखेडा पर्यंत सिंमेट रस्त्याचे मागिल २ ते ३ वर्षा पासुन कासव गतीने काम चालु असुन अर्ध्या रस्त्यावरून वाहतुक चालु असुन जागो जागी रस्त्यावर खोद काम केल्यामुळे पावसाळा सुरू झाल्याने रस्त्यावर पाणी साचुन चिखल होत असल्या ने दररोज ये- जा करणा-या शालेय विद्यार्थ्यी, शेतकरी व परिसरातील नागरिकांना भयंकर त्रास सहन करून कधी कधी अपघाताला बळी पडुन नागरिक जख्मी होत असल्याने शनिवार (दि.२२) जुन ला सकाळी ९.३० वाजता ग्रा प बोरडा सरपंचा रेखा डडुरे, निमखेडा सरपंचा कलावती तडस, बोरडा उपसर पंच नरेंद्र ठाकरे, सदस्य रामराव बंड, धनराज गडे, राजु डडुरे, दिनेश बंड, विनोद मानवटकर, प्रमोद डडूरे, गजानन कडु, शंकर सोनवणे, निरंजन बालकोटे, मुकेश सोनवणे सह बोरडा, निमखेडा, बोरी (राणी) येथील त्रस्त गावकरी नागरिकांनी ही समस्या त्वरित सोडवण्यास शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता या रस्त्यावर आंदोलन केले असता काही वेळातच नव निर्वाचित खासदार श्यामकुमार बर्वे हयानी पोहचुन संबधित अधिकारी व कंत्राटदाराला फोनवर तातडीने काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. या पुढे सुद्धा कंत्राट दारांच्या हरगर्जीपणामुळे माझ्या रामटेक लोकसभा क्षेत्रातील नागरिकांना त्रास होऊ देणार नाही आणि त्वरित काम पूर्ण न केल्यास कंत्राटदारांवर योग्य ती कारवाई केली जाईल असे खासदार श्यामकुमार बर्वे यानी उपस्थिताना आश्वस्त केले.

दुपारी १२ वाजता संबधित कंत्राटदार, अधिकारी आंदोलन स्थळी पोहचले असता प्रहार जनशक्तीचे रमेश कारेमोरे, जि प सदस्य व्यकटेश कारेमोरे, कैलास खंडार हयानी त्यांच्याशी बोलुन त्वरित काम सुरू करू न नागरिकाना या पुढे त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले. काम सुरू झाल्याने शेतकरी, नागरि कांनी आपआपले ट्रक्टर हटवुन आंदोलन समाप्त केले. आंदोलन स्थळी कन्हान पोलीस निरिक्षक उमेश पाटील आपल्या सहकर्मचा-यासह उपस्थित राहुन नागरिकांना समाजावुन त्याची समस्या गंभीर असल्या ने समोचाराने मार्ग काढण्यास सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *