- Breaking News, नागपुर समाचार

क्वारंटाइन सेंटरवरती कार्यरत ६४ सुरक्षा रक्षकांना कामावरुन काढण्यात आले

सोमवारपर्यंत या सुरक्षा रक्षकांना कामावर न घेतल्यास मनपा समोर बेमुदत आमरण उपोषण – प्रशांत पवार

नागपुर : मनपा मध्ये मागील २० वर्षांपासून १. सुपर सिक्युरिटी २. किशोर सिक्युरिटी ३. युनिटी सिक्युरिटी यांना २९० सुरक्षा रक्षकांना लावण्याचे कंत्राट दिल्या जात आहे. नियमानुसार या एजन्सी कामगारांच्या बँक खात्यामध्ये किमान वेतनानुसार १४,८२४/- रुपये जमा करतात परंतू त्या एजन्सीच्या सुपरवायझर द्वारे अर्धा पगार कॅशमध्ये परत घेतला जातो, दिला नाहीतर त्यांना कामावरून कमी करण्याची धमकी दिल्या जाते. म्हणून जय जवान जय किसान द्वारे मनपा आयुक्त मा.तुकाराम मुंडे यांना १३ जुलै रोजी रितसर तक्रार देण्यात आली. परंतू अचानकपणे १ ऑगस्टला चवथी एजन्सी निविदा प्रक्रियानुसार दाखवून १ ऑगस्ट पासून उपरोक्त तीनही एजन्सीच्या ६४ सुरक्षा रक्षकांना कामावरुन कमी करण्यात आले. याची तक्र र ४ ऑगस्ट रोजी करून मा. तुकाराम मुंडे यांना भेटीची वेळ मागण्यात आली.

मा. तुकाराम मुंडे यांनी उपायुक्त मा.निर्भय जैन यांच्या सोबत आज ७ ऑगस्ट रोजी ४ वाजता चर्चा करण्याचे सुचविले. ४ वाजता उपायुक्त निर्भय जैन यांच्या केबिन मध्ये प्रशांत पवार अध्यक्ष ज.ज.ज.कि, अरुण वनकर सचिव, कृष्णराव खंडाळे व दोन सुरक्षा रक्षक यांनी चर्चा केली. १३ जुलै तक्रार केली असता त्या एजन्सी विरुद्ध कार्यवाही न करता अचानकपणे निविदा प्रक्रिया दाखवून १ ऑगस्ट पासून ४ एजन्सींना सुरक्षा रक्षकांचे कत्रांट वाटून दिल्या जाते कसे काय? यावर ऑक्टोबर २०१९ मध्ये हि निविदा प्रक्रिया राबविण्यात आली पण वर्क ऑर्डर जुन्या त्याच ३ एजन्सी व एक नविन एजन्सीला देण्यात येतो. या मागेच संगनमताने तक्रारी करणाऱ्या किंवा पुढाकार घेणार्या सुरक्षा रक्षकांना कामावरुन काढण्या करीता या वर्क ऑर्डरचा वापर करण्यात आला असा स्पष्ट आरोप लावण्यात आला. पंतप्रधानांनी जाहिर केल्वा नंतरही कोरोना योद्धानांच उपासमारीचे बळी ठरविण्या करीता कामावरून कमी केले जाते ते ही मनपा मध्ये, गरम चर्चेनंतर या ६४ सुरक्षा रक्षकांना सोमवार १० ऑगस्ट पर्यंत कामावर घेण्यात यावे. त्यांना कामावार रुजू करण्यात आले नाहीतर मंगळवार ११ ऑगस्ट पासून महानगर पालिकेच्या आवारात सुरक्षा रक्षकांच्या परिवारा सहित जय जवान जय किसानचे पदाधिकारी आमरण उपोषणाला प्रारंभ करतील असा इशारा देण्यात आला.

यावेळी प्रशांत पवार यांनी मनपा मधील भ्रष्ट्राचार मेट्रो रेल्वे प्रमाणेच शोधून काढून तो जनतेसमोर जय जवान जय किसान संघटनेतर्फे उघड करणार असे जाहिर केले. या प्रसंगी मोठया संख्येत सुरक्षा रक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *