- Breaking News, PRESS CONFERENCE, नागपुर समाचार

नागपूर समाचार : पश्चिम नागपूर नागरिक संघ श्रीराम मंदिर, रामनगर, नागपूर तर्फे भव्य शोभायात्रेचे आयोजन

नागपूर समाचार : पश्चिम नागपूर नागरिक संघातर्फे प्रतिवर्षी प्रभु श्रीरामचंद्राचे नवरात्र व श्रीराम जन्मोत्सव अतिशय मक्तिभावाने आणि उत्साहाने साजरे केले जातात. श्रीराम नवरात्राचा एक भाग म्हणजे रामरावाची भव्य अशी शोभायात्रा बुधवार दि. १७ एप्रिल २०२४ रोजी सायं. ५:३० वा. श्रीराम मंदिर, रामगनगर येथुन शोभायात्रा निघणार आहे. हया शोभायात्रेचे व श्रीरामाच्या पादुका असलेल्या पालखीचे पुजन पंजाबचे राज्यपाल महामहिम आदरणीय श्री बनवारीलालजी पुरोहित, केंद्रिय मंत्री ना. श्री नितीनजी गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. श्री देवेंद्रजी फडणवीस, माजी खा. श्री अजयजी संचेती, माजी मंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे, माजी राज्यमंत्री आ. श्री परिणयजी फुके, आ. श्री विकासजी ठाकरे, आ. श्री प्रविणजी दटके, श्री अनिलजी आष्टनकर, प.ना.ना. संघाचे अध्यक्ष रवि वाघमारे, कार्यवाह राजीव काळेले, शोभायात्रा २०२४ व्या अध्यक्षा सौ. निलिमाताई बावणे, कार्याध्यक्ष श्री लोकेशजी आष्टनकर, स्वागताध्यक्ष श्री आनंद परचुरे, प्रमुख मार्गदर्शक श्री बसंतलालजी साव यांच्या हस्ते पुजन झाल्यानंतर शोभायात्रेला प्रारंभ होईल. गुढीपाडवा ते रामनवमी पर्यंत मोठ्या प्रमाणात धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, भजने कीर्तने आदि साजरी केली जातात. मागील वर्षीच्या शोभायात्रेत अयोध्येतील राममंदिराची प्रतिकृती भक्तांचे आकर्षणाचे केंद्र होती.

यावर्षीच्या शोभायात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे भव्य चल चित्ररथावर अयोध्येतील नवनिर्मित श्रीराम मंदिर व रामललाची मुर्ती आकर्षक उत्सव मुर्तीचा विशेष रथ, पश्चिमेश्वर श्री हनुमान, ताडका वध, सुरसा राक्षसीचा वध रामभक्तांचे मन वेधुन घेईल. भगवान कल्की अवतार हे यावर्षीचे आकर्षण, रामायणातील इतर प्रसंगावरील चित्ररथ, विविध देवी, देवता व खास करून विदर्भाचे दैवत कोराडीची जगदंबा माता, थापेवाडयाचे विठठ्ठल रुक्मीणी, शेगावचे गजानन महाराज विशेष आकर्षण असेल. स्वातंत्रवीर सावरकरांच्या साथ जन्मशताब्दी निमित्त सजीव चित्ररथ, संचेती पब्लीक स्कुल, ग्लोबल स्कूल, ज्यूदो प्रात्यक्षिक, प्रहार संघटना, संत गाडगे महाराज भजन मंडळ बग्गी, ओपन जीप, जय शिव ब्लेसिंग आर्चरी नेमबाजीची प्रात्यक्षिके व अनेक चल अचल झाक्या राहतील. सोबत निमंत्रण पत्रिका व वित्ररथांची यादी दिली आहे. यावर्षी शोभायात्रेत ३१ आकर्षक चित्ररथ (झांकी) राहणार आहेत. शोभायात्रेच्या संपुर्ण मार्गावर संस्कार भारती तर्फे आकर्षक रांगोळ्या काढण्यात येतील. शोभायात्रेच्या मार्गावर रामभक्तांच्या संघटना, विविध प्रतिष्ठाने, मंडळे थंड पाणी, शरबत, ताक, लस्सी, लाडु, पेडे, चने, पोहे इत्यादीचे वाटप करतात.

शोभायात्रा यशस्वी करण्याकरिता सर्वश्री रवि वाधमारे, राजीव काळेले, सौ. निलिमाताई बावणे, लोकेश आष्टनकर, विनोद जोशी, अजय डबीर, अॅड. राहुल पुराणिक, मुकुंद सरमुकद्दम, अशोक पात्रीकर, मिलिंद वझलवार, श्रीराम सावरकर, अशोक गुजरकर, प्रभाकर देशपांडे, जयंत आपटे, चंद्रशेखर घुशे, दिपक खिरवडकर, श्रीधर पात्रीकर, दिलीप बोटे, अनिरूध्द पालकर, श्रीमती मृणाल पुराणिक, दत्तात्रय खरे, वृषाली शिलेदार, अनिल हस्तक, मुकुंद महाजन, रामचंद्र देवपुजारी, अशोक आग्रे, यशवंत जानवे, आनंद कळमकर, विनोद गुप्ता, राजन भुत, आदित्य काळेले, अजिंक्य काळेले, विजय घाटे, दिलीप आगरकर, आकाश सावरकर, अशोक चवरे, नारायण निघोट, ओंकार पुराणिक, गुंदुभाऊ मसुरकर, विशाल उमाळकर, मनिष बागलकोटे व अनेक रामभक्त कार्यरत आहेत.

अंबाझरी, सिताबर्डी, बजाज नगर वाहतुक शाखा आदि पोलीस स्टेशनचे अधिकारी व पोलीस गण यांचे विशेष सहकार्य लाभले आहे तसेच नागपूर महानगर पालिका स्वच्छतेचे काम करण्यात सहभाग घेत आहे. शोभायात्रेचा मार्ग श्रीराम मंदिर रामनगर येथुन प्रारंभ, बाजीप्रभु चौक, लक्ष्मीभुवन चौक, कॉफी हाऊस चौक, श्री काळेले यांचे घर, झेंडा चौक, लक्ष्मीनारायण मंदिर चौक, लक्ष्मीभुवन चौक, शंकरनगर चौक, बजाज नगर चौक, लक्ष्मीनगर चौक, अभ्यंकर नगर चौक, व्ही.एन.आय.टी. गेट चौक, एलएडी कॉलेज चौक, स्व. पुष्पलता तिडके चौक, हिलरोड मार्गे बाजीप्रभु चौक, श्रीराम मंदिरात सांगता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *