- Breaking News, PRESS CONFERENCE, नागपुर समाचार

नागपूर समाचार : निवडणुका जिंकल्यावर पक्ष बदल करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणार आणि हुकुमशाहीचे राजकारण थांबविण्याकरिता शेवट पर्यंत लढा देणार – धानु भिकाजी वलथरे

नागपुर समाचार : संपूर्ण देशात विद्यमान शासनकर्ते हुकूमशाहीच्या मागनि देशाची सत्ता आपल्या हातात ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत. महाराष्ट्रातील सत्तांतर अशाच हुकूमशाही पद्धतीने झाले आहे हे सर्वांना माहित आहे. सर्व मतदार बंधु भगिनी राजकारण करणाऱ्या नेत्यांच्या खोट्या आश्वासनांना व भूलथापांना बळी पडतात व त्यांना भरघोष मते देतात व त्यांच्या मताच्या आधारे हे निवडून आलेले नेते सत्ता उपभोगतात. 

ज्या मतदार बंधु-भगीनींनी आपल्या मताचा आधार या नेत्यांना दिला, ते बिचारे मतदार दलित वर्ग, बंचित, आदिवासी मागासवर्गीय आहेत, त्यांचे शोषण होत असते. जे भ्रष्टाचारी कार्यकर्ते-नेते, दुसऱ्या पक्षात आहेत किंवा होते तशांना सध्याची सत्ताधारी मंडळी ह्यांना आपल्या पक्षात प्रवेश करून घेतात व त्यांनी केलेले सर्व पाप धुवून काढतात. मग असे दोष अर्थात सध्याचे सत्ताधारी पक्ष हा भ्रष्टाचाऱ्यांचाच पक्ष झाला व होत आहे असे म्हटले तर असंयुक्ति होणार नाही. गरीबांची गरीबी कमी होण्याऐवजी गरीबांचे शोषण होत आहे, महागाई कमी होण्याऐवजी महागाई दिवसेंदिवस वाढत आहे, बेरोजगारांना रोजगार मिळण्याऐवजी बेरोजगारी वाढत आहे. रोजगार मेळाव्याच्या नावाखाली सुशिक्षित बेरोजगारांची बट्टामस्करी होत आहे, विकासाच्या नावाखाली कोट्यावधी रकमेचा घोळ होत आहे. कोणी वरीलप्रमाणे अन्य विषयावर बोट ठेवले किंवा आवाज उठविला तर स्थांना देशद्रोही ठरवून कारागृहाचा रस्ता दाखविणे अथवा जे श्रीमंत असतील त्यांना ई.डी.चा धाक दाखवून चूप बसविण्यात येते. हे लोकशाही राज्यात अर्थात आपल्या भारत देशाला पोषक नाही.

दादासाहेब वलथरे यांना समस्त भोई, विबर, कहार, केवट इत्यादी समाज बांधवांचा तसेच मागासवर्गीय दलित, बंचित समाजाच्या अनेक संघटनांचा भरघोस पाठिंबा असून नागपूर येथील झिरो माईलच्या भोई समाज भवनाच्या मागणीकरिता अनेकदा आंदोलने करूनही ही मागणी पूर्ण झाली नाही त्याकरिता माझ्या संपूर्ण समाजाच्या मतदार बंधू-भगीनींच्या मताधिकाऱ्याने मलाच निवडून आणावे, ही आग्रहाची विनंती दादासाहेब वलथरे यांनी केली.

आजही नागपूर शहरामध्ये बन्याच समस्या आ वासून उभ्या आहेत. त्याचर संपूर्ण ताकदीनिशी उभे राहून या प्रश्नाना वाचा फोडण्याकरिता मी कटिबद्ध आहे. त्याकरिता आपल्या बहुमूल्य मतांचा आशीर्वाद देऊन मला प्रचंड बहुमताने विजयी करावे ही विनंती.

सध्याचे गढूळ राजकारण थांबले पाहिजे या एकमेव उद्देशाने तसेच सुप्रशासन असावे असा एकमेव उद्देश घेऊन मी ‘१०- नागपूर लोकसभा मतदार संघाची’ निवडणूक लढवित आहो. माझ्या घोषणापत्रात मी एकूण २२ मुद्दे जाहीर केले आहेत. त्यात माझा पूर्वइतिहास देखील थोडक्यात नमूद केला आहे. म्हणून आपण सर्वांना आग्रहाची विनंती आहे की आता आपप सर्व मतदार बंधु-भगीनींनी माझ्या निवडणूक चिन्ह ‘मनुष्य व शिडयुक्त नाव’ (बोट) समोरील बटन दाबून भरघोष मताधिक्क्यांनी विजयी त्यांना घरचा रस्ता दाखवावा, अशी विनंती केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *