- Breaking News, Meeting, नागपुर समाचार

नागपुर समाचार : ओबीसींची चळवळ सक्षम करण्यासाठी तेली समाज ठाकरेंच्या पाठीशी

नागपूर समाचार : आमदार अभिजीत वंजारी यांना पद्वीधर निवडणूकीत ज्या पद्धतीने बहुजन समाजाने पाठींबा दिला होता, त्याच आधारावर आता तेली समाजही विकास ठाकरे यांना पाठिंबा देऊन ओबीसींची राजकीय चळवळ आणखी सक्षम होणार असल्याचा विश्वास माजी उपमहापौर व राष्ट्रवादीचे नेते शेखर सावरबांधे यांनी व्यक्त केला.

जवाहर विद्यार्थी गृह येथे आमदार अभिजीत वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यात महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे यांना तेली समाजाने पाठिंबा जाहीर केला आहे. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आमदार अभिजीत वंजारी होते. यावेळी अभिजीत वंजारी म्हणाले की, तेली समाज हा भाजपा धार्जिना आहे, अशी अफवा पसरविण्यात येते, हि बाब आम्हाला मान्य नाही. गेल्या पन्नास वर्षात काँग्रेसने विदर्भात २७ तेली समाज बांधवांना आमदार, खासदार, मंत्री केले तर भाजपाने केवळ ७-८ लोकांना ही संधी दिली. त्यामुळे हा समाज कसा भाजपा सोबत जाऊ शकतो? हि जुमलेबाजी आहे व समाजाची कोणीही ठेकेदारी करू नये असा ईशाराही त्यांनी यावेळी दिला.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा श्रीमती संध्याताई सवालाखे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी मार्गदर्शन करतांना सांगीतले की, महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणने ही काळाची गरज आहे. कोणत्याही मित्र पक्षाचा उमेदवार असो तेली समाजाचे त्या उमेदवाराच्या पाठीशी राहावे. या देशात ५० टक्के महिला आहेत व महिलाच परिवर्तन घडवू शकतात. 

यावेळी हसनबाग येथे ईद निमित्य लोकांना भेटण्यासाठी कांग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे आले असतांना त्यानी या मेळाव्याला भेट दिली व गुडीपाडवा निमित्य समाजबांधवांना शुभेच्छा देतांना सांगीतले की, मी बहुजन समाजाचा व्यक्ती असून आता माझी लढाई बहूजनांवर अवलंबून आहे. मला आशिर्वाद मिळाला तर खासदार म्हणून ओबीसी, मागासवर्गीय व अल्पसंख्या सर्वांना सोबत घेऊन सर्वांना न्याय देईल.

यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रिय सचिव नितीन कुंभलकर, माजी नगरसेवक पुरुषोत्तम हजारे, संजय महाकाळकर, ओबीसी नेत्या संगीता तलमले, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)च्या महिला शहर अध्यक्षा मंगला गवरे, समाजवादी पक्षाचे प्रदेश महासचिव डॉ. विजय सुरकर, आप पक्षाचे शहर अध्यक्ष अजिंक्य कळंबे, माजी नगरसेवक नितीन साठवणे यांनी ही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन विनायक तुपकर यांनी केले तर माजी नगरसेवक नेताजी साकोरे, नाना झोडे, नयना झाडे, शिला तराळे ही नेते मंडळी मंचावर उपस्थित होते.

या मेळाव्याला समाजाचे जेष्ठ राजेंद्र बा. झाडे, रत्नाकर जयपुरकर, मिलींद नाकाडे, संजय बांदरे, संजय शिंदे, अॅड. पुरुषोत्तम घाटोळे, किशोर उमाठे, हरिभाऊ किरपाने, सुरेशराव साठवणे, अविनाशजी मानापूरे, सुभाष वैरागडे, नरहरी सुपारे, नरेंद्र दिवठे, विनोद टिकले प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *