- Breaking News, आंदोलन, नागपुर समाचार

नागपूर समाचार : बागेश्वरधामचे धीरेंद्र शास्त्री (बाबा) वर गुन्हा दाखल करा, परमात्मा एक सेवकांची मांगणी

मोहाडी समाचार : येथे सुरू असलेल्या बागेश्वरधामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या प्रवचनात परमात्मा एक सेवक धर्माबाबत विवादात्मक टिप्पणी केल्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सुमारे‌‌ शंभरावर सेवकांनी पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. यामुळे काही काळ वातावरण तापले होते. गुन्हा दाखल न ‌झाल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.

मोहाडी येथे बागेश्वरधाम बाबांचे २७ मार्चपासून सात दिवसीय धार्मिक प्रवचन सुरू आहे. प्रवचनात परमात्मा एक सेवक धर्माबाबत या बाबांनी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने सेवकांच्या भावना दुखावल्या गेल्या‌ आहेत.

बाबांनी आपल्या धर्माबाबत सांगावे, त्याचा प्रचार करावा परंतु अन्य धर्मावर टीकाटिप्पणी करू नये, असे‌‌ सेवकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शनिवारी सायंकाळी शेकडो परमात्मा एक सेवकांनी मोहाडी पोलिस स्टेशन गाठून धीरेंद्र शास्त्री यांच्यावर गुन्हा‌ दाखल करण्याची मागणी केली. गुन्हा दाखल न केल्यास विदर्भातील लाखो‌ सेवक एकत्र येऊन तीव्र आंदोलन‌ करतील, असा इशारा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *