- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : ‘एमआयए’चा स्थापना दिवस 2 मार्चला; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्‍थ‍िती

उद्यमशीलता उत्कृष्ट पुरस्कारांचे होणार वितरण 

नागपूर समाचार : एमआयडीसी इंडस्ट्रिज असोसिएशन (एमआयए)तर्फे शनिवार, 2 मार्च रोजी सकाळी 12 वाजता वाडी एमआयडीसी टी पॉईन्ट एमआयडीसी रोडवरील हॉटेल सोलिटेयरमध्ये स्थापन दिनाचे आयोजन करण्‍यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्‍थ‍िती राहणार असून खासदार कृपाल तुमाने, आमदार समीर मेघे आणि एमएसएमईचे संचालक पी.एम. पार्लेवार यांची विशेष उपस्थिती राहील. या कार्यक्रमात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते उद्यमशीलता उत्कृष्ट पुरस्कार प्रदान करण्‍यात येणार आहेत. 

एमआयए ही कामगार संघटना कायद्यांतर्गत नोंदणीकृत संघटना असून एमआयडीसी, हिंगणा परिसरातील उद्योगांच्या कल्याणासाठी आणि उन्नतीसाठी प्रयत्न करते. हिंगणा औद्योगिक क्षेत्रात संघटनेचे 500 हून अधिक सक्रिय सदस्य असून 1000 हून अधिक उद्योग आहेत, त्यापैकी बहुतेक एमएसएमई क्षेत्रांतर्गत येतात. सदस्यांच्या गरजा भागविण्यासाठी येथे पूर्णपणे सुसज्ज अत्याधुनिक टेस्ट लॅब देखील आहे.

या कार्यक्रमाला मोठ्या संख्‍येने उपस्‍थ‍ित राहावे, असे आवाहन एमआयएचे अध्यक्ष कॅप्टन सी. एम. रणधीर, सचिव पी. मोहन, कोषाध्यक्ष अरुण लांजेवार, कार्यकारी अध्यक्ष योगेश कटारिया, उपाध्यक्ष अरविंद कालिया, गणेशलाल जयस्वाल, नागराज रेड्डी व पदाधिका-यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *