- Breaking News, खासदार क्रीड़ा महोत्सव, नागपुर समाचार

नागपूर समाचार : खासदार क्रीडा महोत्सव 2024; बेंच प्रेस पॉवरलिफ्टिंग स्पर्धेला सुरूवात

नागपूर समाचार : खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत पॉवर लिफ्टिंग स्पर्धेचे मंगळवारी (ता.२३) पूर्व नागपूरचे आमदार श्री. कृष्णा खोपडे यांच्या हस्ते गरोबा मैदान येथे उद्घाटन झाले. याप्रसंगी स्पर्धेचे समन्वयक माजी नगरसेवक नरेंद्र (बाल्या) बोरकर, कन्वेनर सचिन माथने, माजी नगरसेवक प्रदीप पोहाणे, दीपक वाडीभस्मे, माजी नगरसेविका मनीषा धावडे, चेतना टांक, कांता रारोकर, क्रीडा शिक्षक अविनाश सहारे, बेंच प्रेस पॉवर लिफ्टिंग असोसिएशनचे आनंद डाबरे, लक्ष्मीकांत मेश्राम आदी उपस्थित होते.

स्पर्धेत खुल्या गटातील मास्टर्स स्पर्धेत यूजीन स्मिथने स्पर्धेत विजयी सुरूवात केली. या गटात राजू दोडके दुस-या तर राजेश गौर तिस-या स्थानी राहिले. महिलांच्या 52 किलो वजनगटामध्ये रोहिनी मेश्रामने विजयासह स्पर्धेची सुरूवात केली. सलोनी कंटाळे आणि श्रावणी गर्जे ने दुसरे आणि तिसरे स्थान प्राप्त केले. 63 किलो वजनगटात अल्फीया शेखने प्रथम स्थान प्राप्त केले. सोनू सरोटे दुस-या तर चंदा ओझा तिस-या स्थानी राहिली. 63 किलोवरील गटात तन्वी रहाटेने पहिले, शुभांगी सुर्यवंशीने दुसरे आणि अर्चना नाडरने तिसरे स्थान प्राप्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *