- Breaking News, खासदार क्रीड़ा महोत्सव, खेलकुद , नागपुर समाचार

नागपूर समाचार : खासदार क्रीडा महोत्सव २०२४ : विदर्भस्तरीय खो खो स्पर्धा

नागपूर समाचार : खासदार क्रीडा महोत्सवातील विदर्भ स्तरीय खो-खो स्पर्धेमध्ये काटोल येथील विदर्भ युथ क्रीडा मंडळ संघाने महिला आणि पुरूष गटात प्रतिस्पर्धी संघांना पराभवाचा धक्का देत स्पर्धेत आगेकूच केली आहे.

विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे सुरू असलेल्या विदर्भ स्तरीय खो-खो स्पर्धेत सोमवारी (ता.15) सकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यांमध्ये महिला गटात विदर्भ युथ क्रीडा मंडळाने अमरावती येथील साई युवक क्रीडा मंडळाचा पराभव केला. काटोल संघाकडून प्रतीक्षा रेवतकरने 3 गडी बाद करीत 2.30 मिनिटांचा उत्तम खेळ सादर केला. याशिवाय संघाची नेहा पेठेने 2 गडी बाद केले व 4.40 मिनिटे खेळून संघाच्या विजयाचा पाया रचला. प्रतिस्पर्धी साई युवक क्रीडा मंडळाची रचना शेंडे (1.10 मि. 1 गडी) अन्य कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. या सामन्यात विदर्भ युथ क्रीडा मंडळ संघाने एका डावाने विजय मिळविला.

पुरूष गटात देखील काटोलच्या विदर्भ युथ क्रीडा मंडळाने अमरावतीच्या साई युवक क्रीडा मंडळाला पराभवाचा धक्का दिला. विजेत्या संघाच्या निकेश मिनाद (2 मि, 2 गडी), दिलराज सिंगर (0.20, 3.10 मि, 1 गडी), खैबर अली (2.10 मि, 3 गडी) यांनी संघाच्या विजयात महत्वाची भूमिका पार पाडली. साई युवक क्रीडा मंडळाच्या अमन साखरे (1.20 मिख 2 गडी) आणि शरद पाटील (3 गडी) यांनी संघाच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर विदर्भ क्रीडा मंडळ काटोल संघाने 1 डाव आणि 3 गड्यांनी विजयावर मोहोर उमटविली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *