- Breaking News, खासदार क्रीड़ा महोत्सव, नागपुर समाचार

नागपुर समाचार : खासदार क्रीडा महोत्सव; मॅरेथॉनमध्ये नागराज खुरसुने, प्राजक्ता गोडबोले प्रथम

खासदार क्रीडा महोत्सव : 16 वर्ष वयोगटात प्रद्युम, जानवी अव्वल

नागपूर समाचार : केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत मॅरेथॉनमध्ये नव महाराष्ट्र क्लबचा नागराज खुरसूने व नाम्या फाऊंडेशनची प्राजक्ता गोडबोले पुरूष व महिला गटातून प्रथम ठरले. पुरूषांच्या 10 किमी आणि महिलांच्या 5 किमी अंतराच्या मॅरेथॉनमध्ये नागराज आणि प्राजक्ता यांनी बाजी मारली. 16 वर्ष वयोगटात मुलांच्या 5 किमी अंतरात अकोल्याचा प्रद्युम गोवते आणि मुलींच्या 3 किमी अंतरात जानवी बावने हे अव्वल ठरले.

शुक्रवारी (ता.12) सकाळी कस्तुरचंद पार्क येथून मॅरेथॉन आणि युवा दौडला आमदार प्रवीण दटके, सहायक पोलिस आयुक्त बिरादार, खासदार क्रीडा महोत्सवाचे सचिव डॉ. पीयूष आंबुलकर, आशिष मुकीम, रितेश गावंडे यांनी मॅरेथॉन आणि युवा दौडला हिरवी झेंडी दाखवली.

पुरूषांच्या 10 किमी शर्यतीत प्रथम नागराज खुरसूने, ट्रॅक स्टार क्लबचा सौरभ तिवारी दुसरा, राजन यादव तिसरा आला तर रोहित झा (ट्रॅक स्टार क्लब), लीलाराम बावणे (नाम्या अॅथलेटिक्स), रितिक पंचबुद्धे (ब्लॅक बर्ड फायर), अजित बेंडे (जय अॅथलेटिक्स क्लब), कुणाल वाघ (ट्रॅक स्टार क्लब), नागेश्वर रासे (गडचिरोली) आणि पीयूष् मसाने (नाम्या अॅथलेटिक्स) यांनी अनुक्रमे चवथा ते दहावा क्रमांक पटकाविला. महिलांच्या 5 किमी शर्यतीत प्राजक्ता गोडबोले पहिली, ट्रॅक स्टार अॅथलेटिक्सची रिया धोत्रे दुसरी आणि मिताली भोयर तिसरी आली. तर तेजस्विनी लांबखाने (नाम्या फाउंडेशन), भाव्यश्री महल्ले (खेलो इंडिया कोचिंग), आचल कडूकर (चंद्रपूर क्लब), अंजली मडावी (नाम्या फाउंडेशन), स्वाती पंचबुद्धे (ब्लॅक बर्ड फायर), चैताली बोरेकर (ट्रॅक स्टार अॅथलेटिक्स) आणि प्राजक्ता मालखाडे (एस.बी. सिटी) यांनी अनुक्रमे चवथे ते दहावे स्थान पटकावले.

16 वर्ष वयोगटातील मुलांच्या 5 किमी अंतराच्या मॅरेथॉनमध्ये अकोला येथील यूनिक अॅथलेटिक्सचा प्रद्युम गोवते विजेता ठरला. वाशिमच्या नंदकिशोर वानखेडे ने दुसरा आणि चंद्रपूरच्या विजय अॅथलेटिक्स क्लबच्या मनीष धावडे ने तिसरा क्रमांक प्राप्त केला. अभय मस्के (राईट ट्रॅक), नमन अवचट (गुरूकुल अॅकेडमी उमरेड), यश कटरे (सेलू), तेजस बनकर (आर.एस.मुंडले), कौशिक चौधरी (ऑल प्रो ट्रॅक अँड फिल्ड), निलेश कोरे (व्ही.वाय.के.एम.) आणि प्रद्युम राऊत (ट्रॅक स्टार) यांनी अनुक्रमे चार ते दहावे स्थान पटकाविले. 16 वर्ष वयोगटातील मुलींच्या 3 किमी शर्यतीत ट्रॅक स्टार क्लबची जानवी हिने प्रथम क्रमांक पटकाविला. ब्ल्यू अॅकेडमीची मधुरा पहाडे आणि नव महाराष्ट्र क्रीडा मंडळाची तन्मयी पिंपळकर यांनी दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला. अनुक्रमे चार ते दहाव्या क्रमांकावर हिमांशी बावणे (ट्रॅक स्टार अॅथलेटिक्स), यशस्वी राठोड (सुर्योधर्म स्पोर्टिंग), लावण्या नगरकर (विजय अॅथलेटिक्स), रिता तरारे (जय अॅथलेटिक्स क्लब), नंदिनी जाधव (एच.टी.के.बी.एस.), नंदिनी सावरकर (सुर्योधर्म स्पोर्टिंग) आणि रिया गोडे (नव महाराष्ट्र) यांनी बाजी मारली.

मॅरेथॉनमध्ये पुरूष आणि महिला गटातील विजेत्यांना 1 ते 10 क्रमांकांसाठी अनुक्रमे, 21 हजार रुपये, 19 हजार रुपये, 17 हजार रुपये, 15 हजार रुपये, 12 हजार रुपये, 10 हजार रुपये, 9 हजार रुपये, 7 हजार रुपये, 6 हजार रुपये आणि 4 हजार रुपये बक्षीस प्रदान करण्यात आले. तर 16 वर्षाखालील मुले आणि मुलींच्या गटात अनुक्रमे पहिल्या ते सहाव्या क्रमांकासाठी 10 हजार रुपये, 7 हजार रुपये, 5 हजार रुपये, 4 हजार रुपये, 3 हजार रुपये 2 हजार रुपये तर सात ते दहा क्रमांकासाठी प्रत्येकी 1 हजार रुपये बक्षीस देण्यात आले. याशिवाय चारही गटात प्रत्येकी 5 स्पर्धकांना 1 हजार रुपये प्रोत्साहन बक्षीस देखील प्रदान करण्यात आले.

खासदार क्रीडा महोत्सवाचे सचिव डॉ. पीयूष आंबुलकर, आशिष मुकीम, डॉ.पद्माकर चारमोडे, प्रकाश चांद्रायण, नागेश सहारे, सचिन देशमुख, जितेंद्र घोरडदेकर, राम वाणी, नरेंद्र (बाल्या) बोरकर, पारेंद्र पटले, अशफाक शेख, डॉ. विवेक अवसरे, प्रमोद तभाने, शेखर सुर्यवंशी, नितीन शिमले, निलेश राउत, यश शर्मा, सनी राउत, रितेश पांडे, विक्की पांडे, पंकज करपे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

अंतिम निकाल (क्रमांक 1 ते 10) पुरुष खुला गट – 10 किमी

1. नागराज खुरसूने (नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ) – 31.58.70

2. सौरभ तिवारी (ट्रॅक स्टार क्लब) – 32.47.69

3. राजन यादव (ट्रॅक स्टार क्लब) – 32.52.29

4. रोहित झा (ट्रॅक स्टार क्लब) – 33.03.16

5. लीलाराम बावणे (नाम्या अॅथलेटिक्स) – 33.25.91

6. रितिक पंचबुद्धे (ब्लॅक बर्ड फायर) – 33.37.16

7. अजित बेंडे (जय अॅथलेटिक्स क्लब) – 34.10.24

8. कुणाल वाघ (ट्रॅक स्टार क्लब) – 34.19.64

9. नागेश्वर रासे (गडचिरोली) – 34.31.62

10. पीयूष् मसाने (नाम्या अॅथलेटिक्स) – 34.47.74

महिला खुला गट – 5 किमी

1. प्राजक्ता गोडबोले (नाम्या फाउंडेशन) – 15.57.07

2. रिया धोत्रे (ट्रॅक स्टार अॅथलेटिक्स) – 16.22.37

3. मिताली भोयर (ट्रॅक स्टार अॅथलेटिक्स) – 16.50.34

4. तेजस्विनी लांबखाने (नाम्या फाउंडेशन) – 17.24.29

5. भाव्यश्री महल्ले (खेलो इंडिया कोचिंग) – 17.49.47

6. आचल कडूकर (चंद्रपूर क्लब) – 18.18.72

7. अंजली मडावी (नाम्या फाउंडेशन) – 18.24.59

8. स्वाती पंचबुद्धे (ब्लॅक बर्ड फायर) – 18.28.63

9. चैताली बोरेकर (ट्रॅक स्टार अॅथलेटिक्स) – 18.34.65

10. प्राजक्ता मालखाडे (एस.बी. सिटी) – 18.42.25

16 वर्ष मुले – 5 किमी

1. प्रद्युम गोवते (यूनिक अॅथलेटिक्स अकोला) – 15.34.22

2. नंदकिशोर वानखेडे (वाशिम) – 16.05.38

3. मनीष धावडे (विजय अॅथलेटिक्स चंद्रपूर) – 16.20.06

4. अभय मस्के (राईट ट्रॅक) – 16.28.22

5. नमन अवचट (गुरूकुल अॅकेडमी उमरेड) – 16.28.48

6. यश कटरे (सेलू) – 16.39.32

7. तेजस बनकर (आर.एस.मुंडले) – 16.41.00

8. कौशिक चौधरी (ऑल प्रो ट्रॅक अँड फिल्ड) – 16.45.06

9. निलेश कोरे (व्ही.वाय.के.एम.) – 16.51.84

10. प्रद्युम राऊत (ट्रॅक स्टार) – 16.59.47

16 वर्ष मुली – 3 किमी

1. जानवी बावणे (ट्रॅक स्टार अॅथलेटिक्स)- 10.11.05

2. मधुरा पहाडे (ब्ल्यू अॅकेडमी)- 10.14.22

3. तन्मयी पिंपळकर (नव महाराष्ट्र)- 10.21.63

4. हिमांशी बावणे (ट्रॅक स्टार अॅथलेटिक्स)- 10.34.09

5. यशस्वी राठोड (सुर्योधर्म स्पोर्टिंग)- 10.38.69

6. लावण्या नगरकर (विजय अॅथलेटिक्स)- 10.48.98

7. रिता तरारे (जय अॅथलेटिक्स क्लब)- 10.57.53

8. नंदिनी जाधव (एच.टी.के.बी.एस.)- 10.58.69

9. नंदिनी सावरकर (सुर्योधर्म स्पोर्टिंग)- 11.14.02

10. रिया गोडे (नव महाराष्ट्र)- 11.17.87

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *