आ. समिर कुणावार यांचे प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन
हिंगणघाट समाचार : हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक तसेच युवा कार्यकर्ते आ.समिर कुणावार यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठया प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत.
आज दि. ३० रोजी हिंगणघाट, समुद्रपुर, सिंदी रेल्वे विधानसभा क्षेत्रातील समुद्रपूर तालुका मधील समुद्रपूर, वडगाव (सावंगी) व परडा येथील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी आ. समीर कुणावार यांचा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसेच कार्यसम्राट आमदार यांची कार्यशैली पहाता मोठ्या संख्येने भाजपात प्रवेश केला.
सदर प्रवेश सोहळा आज दि. ३० रोजी आ. समीर कुणावार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी प्रामुख्याने गिरधर लढी, नरेश लढी, लंकेश राऊत, कृणाल मुडे ,गौरव लढी, वैभव लढी, गजानन रोकडे ऋषिकेश रोकडे, गणेश लढी, प्रमोद बटाले, मंगेश खंडाळकर, आदित्य मडावी, कृणाल भगत, लहू खंडाळकर , प्रदीप रोहनकर, गजानन झाडे, नरेंद्र नांदुरकर, धनंजय महाकालकर, निलेश मुंगले, भूपेंद्र नांदूरकर, कवडू वैद्य, देवा पाल, दादाराव नांदुरकर, बापूराव पाल, नथुजी फुकट, हरी विठ्ठल बारई , नंदकिशोर चंदनखेडे, गोपाल फुकट , बिबीशन तडस, मारुती चौधरी, विठ्ठल चंदनखेडे ,सुनील रोहनकर, संजय नांदुरकर, विभीशण महाजन इत्यादी कार्यकर्त्यांना रितसर भाजपात प्रवेश देण्यात आला.
उपरोक्त कार्यक्रम आमदार समीर भाऊ कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
उपरोक्त कार्यक्रमाचे वेळी कार्यसम्राट आ.समीर कुणावार यांचेसह भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अंकुश ठाकूर, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश महामंत्री रवी उपासे, भारतीय जनता पार्टी विधान सभा प्रमूख संजय डेहणे, भाजपा जिल्हा महामंत्री आकाश पोहाणे, हिंगणघाट तालुका भाजपा अध्यक्ष विनोद विटाळे, समुद्रपूर भाजपा तालुका अध्यक्ष वामन चंदनखेडे, समुद्रपूर माजी नगराध्यक्ष गजानन राऊत, शंकरराव मुंजेवार ,रवींद्र लढी, प्रल्हाद नांदुरकर ,नारायणराव बादले ,राजू माडेवार, अंकुश खुरपडे सरपंच ,कैलास टिपले, रमेश मडावी सरपंच, शेषराव तुळनकर, इत्यादी भाजपा पदाधिकारी तसेच जेष्ठ कार्यकर्ते सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.