- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर/कोराडी समाचार : महालक्ष्मी जगदंबा संस्थानच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची फेरनिवड

नागपूर/कोराडी समाचार : येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानच्या अध्यक्षपदी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. पुढील पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी त्यांची फेरनिवड झाली आहे.

रविवारी रोजी श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानमध्ये विश्वस्त मंडळाची निवडणूक पार पडली. अध्यक्षपदी निवड झाल्यावर श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. नव्या कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी अजय विजयवर्गीय, सचिवपदी दतू समिरितकर, सहसचिवपदी प्रभाताई निमोने, कोषाध्यक्षपदी नंदकिशोर बजाज यांची निवड करण्यात आली. सभेला केशवराव फुलझेले महाराज, सुशीला मंत्री, डॉ. नंदिनी त्रिपाठी, स्वामी श्री निर्मलानद महाराज, श्री लक्ष्मीकांत तडस्कर उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले की, ‘श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानच्या विकासात सर्व विश्वस्त, दानदाते, देवस्थानचे कर्मचारी यांनी पदोपदी केलेली मदत माझ्यासाठी प्रेरणादायी ठरली, अध्यक्ष झाल्यावर अशी भावना व्यक्त केली. ते म्हणाले,’पुन्हा एकदा माझ्यासारख्या सामान्य भक्तावर आपण विश्वास दाखविला. मंदिराचा विकास करण्यासाठी येत्या काळातही आपले सर्वांचे प्रयत्न असेच सुरू राहतील. आई जगदंबेच्या आशीर्वादाने संस्थानच्या माध्यमातून सुरू असलेले विविध सामाजिक, वैद्यकीय, धार्मिक उपक्रम पुन्हा नव्या जोमाने आपण पुढे सुरू ठेवू.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *