- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा जनतेशी संवाद; दयानंद पार्क येथे विकसीत भारत संकल्प यात्रा

केंद्र सरकारच्या विविध योजनांतून नागरिकांच्या जीवनात बदल

नागपूर समाचार : केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे नागरिकांच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल झाले आहेत. विकसीत भारत संकल्प यात्रा केंद्र शासनाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यात महत्वाची भूमिका निभावत आहे, असे प्रतिपादन देशाचे मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केले. 

केंद्र शासन पुरस्कृत तसेच राज्य शासनाच्या योजनांची नागरिक, विद्यार्थी, महिला, कामगार व इतर गरजू घटकांना माहिती व्हावी यासाठी देशभरात 15 नोव्हेंबर 2023 पासून ‘विकसित भारत संकल्प यात्रेचे’ नियोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत आज शनिवार दि. 16 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे या यात्रेसाठी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत केंद्रीय योजनांमुळे भारतीयांना होत असलेल्या लाभाची माहिती दिली.

नागपूर महानगरपालिकेद्वारे शनिवारी (ता. 16) मंगळवारी झोन अंतर्गत जरीपटका येथील दयानंद पार्क येथे विकसीत भारत संकल्प यात्रा चे आयोजन करण्यात आले होते. विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान मोदी यांनी साधलेल्या संवाद ऐकण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपायुक्त श्री. रवींद्र भेलावे, उपायुक्त श्री. सुरेश बगळे, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, माजी नगरसेवक श्री. वीरेंद्र कुकरेजा, सहायक आयुक्त श्री प्रकाश वराडे, समाज विकास अधिकारी डॉ. रंजना लाडे, कार्यकारी अभियंता श्री. सुनील उईके, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, डॉ. विंकी रुघवानी, माजी नगरसेवक श्री. महेंद्र धनविजय, माजी नगरसेविका श्रीमती प्रमिला मथरानी, माजी नगरसेवक श्री. प्रभाकर येवले, विजय केवलरामाणी, मंगळवारी झोनचे झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अतिक खान, उपअभियंता कन्हैया राठोड, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे श्री. स्वप्नील लोखंडे, बंडू पारवे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. 

दयानंद पार्क येथे उज्ज्वला गॅस योजना, पीएम स्वनिधी, आरोग्य तपासणी, सिकलसेल तपासणी, क्षयरोग स्क्रीनिंग, अमृत योजना, आधार अपडेशन, आयुष्मान भारत योजना या योजनांचा नागरिकांनी मोठ्या संख्येत लाभ घेतला. 

कार्यक्रमात मनपाचे जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी यांनी उपस्थितांना विकसीत भारत ची शपथ दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *