नागपूर समाचार : जिल्हयातील 195 ग्राम पंचायतींमध्ये विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेची व्हॅन पोहोचली असून 1 लाख 20 हजार नागरिकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतलेला आहे. या मोहिमेमध्ये लोकप्रतिनिधीही सहभागी होत आहेत. या मोहिमेंतर्गत नागरिकांपर्यंत ज्या योजना पोहचविण्यात आल्या आहेत. या मोहिमेच्या अंमलबजावणीत नागपूर जिल्हा राज्यात आघाडीवर असून नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. 16 डिसेंबरला दुपारी 4 वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे विकसित भारत संकल्प यात्रेतील सहभागींना संबोधित करणार आहेत.
नागपूर जिल्हयातील, रामटेक तालुक्यातील नगरधन, सावनेर तालुक्यातील भानेगाव, हिंगणा तालुक्यातील किरमिटी(भा.), नरखेड तालुक्यातील सावरगाव, मौदा तालुक्यातील खात, व उमरेड तालुक्यातील सिर्सी या सहा ग्राम पंचायतस्तरावर थेट प्रक्षेपण आयोजित केले आहे. नागरिकांनी “विकसित भारत संकल्प यात्रा” या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावेत, याची खात्री करण्याच्या उद्देशाने “विकसित भारत संकल्प यात्रा” नावाची देशव्यापी मोहिम केंद्र शासनाकडून आखण्यात आली असून 15 नोव्हेंबर 2023 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत सदर मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु आतापर्यंत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत पोहचणे, महितीचा प्रसार आणि योजनांबद्दल जागरुकता निर्माण करणे, नागरिकांशी संवाद – वैयक्तिक अनुभव शेअरिंगव्दारे सरकारी योजनांचा लाभार्थ्यांशी संवाद साधणे, यात्रेदरम्यान निश्चित केलेल्या तपाशिलांव्दारे संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करणे आदि या यात्रेची उद्दिष्टे आहेत.
या मोहिमेत आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड, आरोग्य तपासणी शिबिर, मृदा(सॉईल) आरोग्य शिबिर, महिला, विद्यार्थी व खेळाडूंना सन्मानित करणे इत्यादि उपक्रमांची अंमबजावणी करण्यात येत आहे.
मोहिमेची नागपूर जिल्हयात प्रभावीपणे अंमलबजावणी, सनियंत्रण, समन्वय, माहिती संकलन, योग्य पध्दतीने सूरु आहे. नागपूर जिल्हयात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे अध्यक्षतेखाली 20 नोव्हेंबरच्या आदेशान्वये जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून या समितीमध्ये केंद्र व राज्य शासनाकडील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
सदर मोहिमेची माहिती नागरिकांना अवगत होण्यासाठी नागपूर जिल्हयाच्या ग्रामीण भागासाठी 6 व्हॅन प्राप्त झालेल्या आहेत.
नागपूर जिल्हयातील सर्व ग्राम पंचायतींमध्ये ग्राम पंचायत स्तरावर समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. या मोहिमेच्या जनजागृतीसाठी प्रधानमंत्री यांनी 30 नोव्हेंबरला प्रत्यक्ष लाभार्थ्यांसोबत संवाद साधलेला आहे. 00000



