- Breaking News, नागपुर समाचार

काटोल समाचार : खुर्सापार येथील अटल भूजल योजनेंतर्गत झालेल्या कामाची पाहणी

प्रधान सचिव संजय खंदारे यांनी केली 

काटोल समाचार : काटोल तालुक्यातील ग्रामपंचायत खुर्सापार येथे अटल भूजल योजना व ICRISAT प्रकल्पांतर्गत झालेल्या कामाची पाहणी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांनी केली.

अटल भूजल योजनेंतर्गत खुर्सापार या ग्रामपंचायतमध्ये, पिजोमीटर, रिचार्ज शाफ्ट, छतावरील पाऊस पाणी संकलन, अभिसरणांतर्गत मृद व जलसंधारणाच्या झालेल्या कामाची पाहणी करण्यात आली, तसेच ICRISAT प्रकल्पांतर्गत लाभ दिलेल्या शेतकऱ्यांशी तसेच सरपंच सुधीर गोतमारे त्यांचे सोबत संवाद साधून शेतकऱ्यांचे तयार करण्यात आलेले, सॉईल हेल्थ कार्डचे अनावरण करण्यात आले, वरिष्ठ भूवैज्ञानिक व भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेमार्फत गावामध्ये होत असलेल्या कामाबाबत समाधान त्यांनी व्यक्त केले.

भेटी दरम्यान डॉ. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे प्रादेशिक उपसंचालक चंद्रकांत भोयर, डॉ. वरिष्ठ भूवैज्ञानिक वर्षा पी माने, भंडाराचे वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. शिवाजी पद्मने, सहायक भूवैज्ञानिक डॉ. रेखा बोधनकर, कनिष्ठ भूवैज्ञानिक राजेश गावंडे, जलसंवर्धन तज्ञ दर्शन दुरबुडे, कृषी तज्ञ प्रतीक हेडाऊ यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *