नागपूर समाचार : नागपूर येथे उद्यापासून महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ होत आहे, या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ‘रामगिरी’ या शासकीय निवासस्थानी चहापान आयोजित करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, विधिमंडळ सदस्य उपस्थित होते.



