- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : लहानग्यांचे दमदार ढोलताशा वादन 

नागपूर समाचार : 6 ते 12 वयोगटातील लहानग्‍या मुलांनी आपल्‍या छोट्या छोट्या हातांनी ढोलताशा सारख्‍या अवजड वाद्यांचे अतिशय दमदार सादरीकरण करून उपस्‍थ‍ितांना आश्‍चर्यचकित केले. 

नवयुग प्राथम‍िक शाळेचे श‍िव नवयुग ढोलताशा व ध्‍वज पथक हे आशिया खंडातील छोट्या मुलांचे पहि‍लेच ढोलताशा पथक असून यात केजी टू ते सातवीचे विद्यार्थी यांचा सहभाग होता. मुख्‍याध्‍यापक अजय काळे व श‍िक्षक गौरव शिंदे यांच्‍या तालमीत तयार झालेल्‍या या विद्यार्थ्‍यांनी ‘वक्रतुंड महाकाय’ व गुरू वंदना सादर करून वादनाला प्रारंभ केला.

श‍िवताल, वक्रतुंड ताल, नागपुरी ताल, बिनधास्‍त तालाचे वादन दमदार वादन करून या लहानग्‍यांनी छत्रपती शिवाजी व संभाजी महाराजांना मानवंदना दिली. ‘दुनिया आपके बच्‍चो को अधर्म सीखाये उसके पहले आप अपने बच्‍चों को धर्म स‍िखाओ’ असा संदेश या वादनातून देण्‍यात आला. कार्यक्रमाला उपस्‍थ‍ित केंद्रीय मंत्री न‍ितीन गडकरी व कांचनताई गडकरी यांनी बालकलाकारांचे भरभरून कौतूक केले.

नितीन गडकरी यांनी अत‍िशय सुंदर प्रदर्शन केल्‍याबद्दल मुलांचे अभिनंदन केले व श‍िक्षकांचा मुलांवर चांगले संस्‍कार केल्‍याबद्दल सत्‍कार केला. राष्‍ट्रीय आंतरराष्‍ट्रीय कलाकारांसोबत स्‍थानिक कलाकारांना सांस्‍कृत‍िक महोत्‍सवामध्‍ये संधी देण्‍यात येते. लहानग्‍यांनी त्‍याचा पुरेपुर लाभ घेत या भव्‍य मंचावर आपले कौशल्‍य दाखवले असे म्‍हणत नितीन गडकरी यांनी या पथकाला भविष्‍यात अधिक चांगले प्रदर्शन करता यावे, यासाठी भरघोस मदत जाहीर केली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *