- Breaking News, नागपुर समाचार, विदर्भ

कामठी समाचार : प्रबोधनपर सांस्कृतिक व संगीतमय कार्यक्रमाने दोन दिवसीय ‘ड्रॅगन पॅलेस फेस्टिवल’ ची उत्साहात सांगता

कामठी समाचार : कार्तिक पौर्णिमेच्या पावन पर्वावर 27 नोव्हेंबर ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या 24 व्या स्थापना दिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे आयोजित महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतीक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने 27 व 28 नोव्हेंबर ला आयोजित दोन दिवसीय ड्रॅगन पॅलेस फेस्टिवल चा प्रबोधनपर संगीतमय व सांस्कृतिक कार्यक्रमाने उत्साहात सांगता करण्यात आली.

27 नोव्हेंबर ला ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या स्थापना दिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे सकाळी 11 वाजता जपान येथील आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट फेलोशीप असोसिएशन व निचिरेन शु सोनेनजी विहाराचे प्रमुख वंदनीय पूज्य भदंत निचियु (कानसेन) मोचीदा यांच्या मुख्य उपस्थितीत व जपान चे जवळपास 30 बुद्ध विहाराच्या प्रमुख भिक्खू संघाच्या सहभागासह विशेष बुद्ध वंदना व धम्मदेसना कार्यक्रम पार पडला. तर दुपारी दीड वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते दोन दिवसीय ड्रॅगन पॅलेस फेस्टिवल तसेच अप्रतिम ‘फूड कोर्ट’ चे उदघाटन करण्यात आले.

याप्रसंगी पुज्यनिय भदंत कानसेन मोचीदा, सहभागी भिक्खू संघ, केंद्रिय मंत्री ना नितीन गडकरी, माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे, आमदार टेकचंद सावरकर, सुप्रसिद्ध आर्किटिस्ट हबीब खान, स्ट्रक्चरल डिझाईनर दिलीप मसे, प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होते. दुपारी 2 वाजता कामठी शहरातील जवळपास 25 विद्यालय व महाविद्यालयासह हरदास हायस्कुल, ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुल च्या विद्यार्थ्यांना तसेच स्थानिक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले होते.

यावेळी सहभागी विद्यार्थ्यासह स्थानिक कलावंतांनी विविध प्रबोधनपर सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले सायंकाळी 7 वाजता मुंबई चे इंडियन आयडल फेम राहुल सक्सेना व सरेगामा फेम राहुल भोसले यांचा ‘बुद्ध ही बुद्ध’ प्रबोधन पर गीतांचा कार्यक्रम पार पडला. 

यावेळी उपस्थित रसिकगण मंत्रमुग्ध झाले होते. तर 28 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजता सहभाग नोंदविलेल्या विद्यार्थ्यांची सांस्कृतिक कार्यक्रमाची स्पर्धा पार पडली. यातील उत्कृष्ट कलावंतांना माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे यांच्या हस्ते पारितोषिके देऊन सम्माणीत करण्यात आले. सायंकाळी 5  वाजता संतोष सावंत यांचा पावा ग्रुप मुंबई बँड व म्युजिक मेडिटेशन कार्यक्रम पार पडला. 

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध पाश्वरगायक पावा यांनी आपल्या बुद्ध भीम गीतांच्या गायनातून रसिकांचे लक्ष वेधले तर उपस्थित रसिकवर्ग खूप आनंदित होते तदनंतर मुंबई येथील संगीताचे जादूगर म्हणून ख्यातिप्राप्त प्रसिद्ध पाश्वरगायक अभिजित कोसंबी व प्रसेनजित कोसंबी व संच यांचा प्रबोधन व सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या उत्साहाच्या नादात उपस्थित रसिकगणांचे पाय आपोआपच थिरकले. यानुसार हा दोन दिवसीय ड्रॅगन पॅलेस फेस्टिवल मोठ्या उत्साहात यशस्वीरीत्या पार पडला असून या दोन्ही दिवशी मोठ्या संख्येत धम्मसेविका, धम्मसेविकेनी उपस्थिती दर्शविली होती. तर प्रबोधनपर संगीतमय व सांस्कृतिक कार्यक्रमाने दोन दिवसीय ड्रॅगन पॅलेस फेस्टिवल ची थाटात सांगता करण्यात आली. तसेच या दोन दिवसीय ड्रॅगन पॅलेस फेस्टिवल मुळे ड्रॅगन पॅलेस परिसर पूर्णपणे गजबजून गेले होते.

या दोन दिवसीय ड्रॅगन पॅलेस फेस्टिवल च्या यशस्वीतेसाठी अजय कदम, संदीप कांबळे, दिपंकर गणवीर, उदास बन्सोड, सुभाष सोमकुवर, अश्फाक कुरेशी, अशोक नगरारे, विष्णू ठवरे, अनुभव पाटील, मनीष डोंगरे, विलास बन्सोड, अंकुश बांबोर्डे, विनय बांबोर्डे, सुशिल तायडे, रेखा भावे, रजनी लिंगायत, वंदना भगत, सुकेशीनी मुरारकर, नंदा गोडघाटे, यासह ड्रॅगन पॅलेस, ओगावा सोसायटी, हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था, हरदास विद्यालय, ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुल, डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक संशोधन केंद्र, दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्र व इतर संस्थेतील पदाधिकारी, शिक्षकवृंद, धम्मसेवक व धम्मसेविकानी मोलाचे परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *