- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : लॉयन इंटरनॅशनल तर्फे ओजस देवतळेचा सत्कार

नागपूर समाचार : लॉयन इंटरनॅशनल च्या वतीने जगनाडे चौक येथील रिजंटा हॉलमध्ये नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात ओजस देवतळे यांचा सत्कार करण्यात आला.

लायन्स इंटरनॅशनल 3234H1 चे जिल्हा गव्हर्नर; Ln. बलबीर सिंग विज, जिल्हयाच्या प्रथम महिला कन्वलजीत कौर विज, जीएटी एरिया लीडर विनोद वर्मा, द्वितीय उपाध्यक्ष भरत भलगट, जिल्हा कॅबिनेट सचिव हरीश गुप्ता, जिल्हा कोषाध्यक्ष मोहिंदरपाल सिंग मान यांनी जागतिक तिरंदाजी चॅम्पियन आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील नागपुर शहरा चा प्रथम सुवर्णपदक विजेता ओजस देवतळे चा लायन इंटरनॅशनल 3234-H1 च्या वतीने शाल, श्रीफळ आणि मोमेंटो देऊन माजी जिल्हा गव्हर्नर रामदेव सिकची, लक्ष्मीकांत राठी, संदीप खंडेलवाल, जयंतीभाई पुनमिया, रमेशभाई शाह यांच्या उपस्थितीत सत्कार केला.

जागतिक तिरंदाजी क्रमवारीत 9 व्या स्थानावर असलेल्या ओजस देवतळेने मिक्स टीम कंपाउंड, मेन्समिक्स कंपाउंड आणि पुरुष वैयक्तिक कंपाऊंडमध्ये 3 सुवर्णपदके जिंकली.

हँगझोऊ; चीन येथील १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने सुवर्णपदकांच्या हॅटट्रिकचा इतिहास रचला. लायन्स चे जिल्हा गव्हर्नर बलबीर सिंग विज यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि सांगितले की त्यांची महान कामगिरी नेहमीच राहील.

आमच्या डिस्ट्रिक्ट आणि लायन मल्टिपल 3234 च्या स्पोर्ट्स रेकॉर्डमध्ये लक्षात ठेवले आणि कोरले गेले. GAT एरिया लीडर

विनोद वर्मा यांनी ओजसचे अभिनंदन करताना सांगितले की, ओजस देवतळे यांची कामगिरी केवळ आपल्या लायन्स जिल्ह्याला पण संपूर्ण देशाला अभिमान वाळला. त्यासाठी लायन्स इंडिया च्या पुस्तकात याचा विशेष उल्लेख आवश्यक आहे. या मेळाव्याला द्वितीय उपजिल्हापाल भरत भलगट आणि वरिष्ठ लायन सदस्य यांचेही भाषण होते. भव्य सत्काराला उत्तर देताना ओजसचे वडील एल.एन. प्रवीण देवतळे यांनी ओजसने केलेले संघर्ष व अडथळे आणि गेल्या 7-8 वर्षांपासून करत असलेल्या कष्टाचे वर्णन केले.

ओजस देवतळे यांनी चीनमधील हांगझाऊ येथे झालेल्या १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील विविध घटना सांगितल्या. केंद्राने केलेल्या उत्कृष्ट प्रयत्नांबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. राष्ट्रीय खेळांच्या उन्नतीसाठी आणि आधुनिक सुविधा आणि तरूण खेळाडू साठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार चा अभिनंदन केला. कार्यक्रमास जिल्हा कॅबिनेट अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *