- नागपुर समाचार

नागपुर / रामटेक समाचार : अखेर रामटेक तालुक्यात कोरोनाचा शिरकाव, नगरधन येथे सापडला पहिला रुग्ण

रुग्णाची सासुरवाडी चिचाळा येथील वॉर्ड क्रमांक चार व नगरधन येथील वॉर्ड क्रमांक सहा पूर्णपणे सील, पुण्यातून आलेला तरुण कोरोना पॉझिटिव्ह

रामटेक / नगरधन समाचार : कोरोनाचा शिरकाव शहराकडून खेडेगावकडे होत असून रामटेक तालुक्यातील नगरधन येथे पहिला रुग्ण सापडला. 29 वर्षीय तरुण पुण्यावरून आपल्या सात महिन्याच्या गर्भवती पत्नीला घेवून 23 तारखेला नगरधन येथे आला. 24 तारखेला सर्व्ह करणाऱ्या चमुला माहिती मिळताच ग्रामीण आरोग्य केंद्र नगरधन येथे दोघाही पती पत्नीची तपासणी करण्यात आली. व त्यांना होम कवारेनटाईन केले होते. तपासणी अहवालात पती कोरोना पॉझिटिव्हचा व पत्नी निगेटिव्ह चा रिपोर्ट आल्याने प्रशासनाने तत्काळ नगरधन गाठून वॉर्ड क्रमांक सहाचा परिसर पूर्णपणे सीलबंद केला.

तसेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची सासुरवाडी नगरधन जवळील चिचाळा हे गाव असून दोघेही चिचाळा येथे भेटीला गेले होते. त्यामुळे चिचाळा येथील वॉर्ड क्रमांक चारचा पूर्ण सील करण्यात आला. रुग्णाला उपचारासाठी नागपूर येथे दाखल केले असून घरचे व सासरचे मिळून दहा सदस्यांना क्वारेनटाईन केले आहे.

यावेळी उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कटियारे, तहसीलदार बाळासाहेब मस्के, पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन नाईकवार, सरपंच प्रशांत कामडी व ग्रामीण आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.

कोरोना चा रुग्ण आढळल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून विविध चर्चांना पेव फुटला आहे. पण प्रशासनाने अतिशय गतीने सूत्रे हलवून रुगणाचे घर व सासुरवाडी गाठून कार्यवाहीस सुरुवात केली. रुग्णाच्या घरी किराणा दुकान असून तो विविध ठिकाणी फिरल्याचीही माहिती लोकांकडून मिळत आहे. त्यामुळे धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *