- Breaking News, नागपुर समाचार, शिक्षा

नागपूर समाचार : गुणवंतांनी देशाला नविन दिशा द्यावी – यशवंत तेलंग

नागपूर समाचार  : सुगत जेसीस तथा इंडिया पिस सेंटर सिव्हिल लाईन्स नागपूर येथे आज दि. ७/७/२०२३ ला ११ वाजता मा. यशवंत तेलंग (अध्यक्ष, सुगत जेसीस) यांच्या अध्यक्षतेखाली गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी एंजील्स मायकल (संचालक, इंडिया पिस सेंटर), मा. योगेश ठाकरे (अध्यक्ष, भारतीय किसान परिषद) यांच्या शुभ हस्ते १०वी, १२वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यात आनंद नरेंद्र नायटे ९५.२ टक्के, कु. दिया जांभुळकर ९१.४० टक्के, मुहम्मद कुमर हयात (उर्दू शायर, कवी) इत्यादी मान्यवरांना प्रमाणपत्र, संविधान प्रस्तावन तथा अशोका वृक्ष मा. एंजील्स मायकल, मा. यशवंत तेलंग, योगेश ठाकरे यांच्या हस्ते देऊन गुणवंतांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी मा. यशवंत तेलंग यांनी अध्यक्ष स्थानावरून संबोधन केले की, गुणवंतांनी देशाला नविन दिशा द्यावी आणि राष्ट्र, समाजाला समतेच्या मूल्यांची क्रांती घडवून नविन दिशा, समाजातील वर्गाच्या हितार्थ वैभव घडवावे.

मा. एंजेल्स मायकल म्हणाले की, विद्यार्थ्यांनी जीवनातील प्रथम यशाचा टप्पा आरंभ केला असून गुणवंतांनी अभ्यासासह मोबाईलचा उपयोग सिमीत कालावधीकरिता करावा आणि समाज व परिवाराचे नावलौकिक नेण्यास सदैव प्रयत्न करावे. पालकांनी घेतलेल्या श्रमाचे कौतुक मा. एंजेल्स मायकल यांनी केले.

मा. योगेश ठाकरे म्हणाले की, आजचा विद्यार्थी देशाचा कणा असून राज्य व केंद्र सरकारने शिक्षणाकडे असलेली उपाययोजना तात्काळ शंभर टक्के खर्च करून उद्याच्या नेतृत्वाला कौशल्यमय, चैतन्यपूर्ण करण्याची जबाबदारी स्विकारावी.

कार्यक्रमात मोरेश्वर टुले, गौतम मोटघरे, संजु नागवंशी, भिमराव रामटेके, दिया जांभुळकर, समिक्षा गावंडे, लिलू पाल, बसंत तिवारी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सम्यक तेलंग तर आभार प्रदर्शन संजय सूर्यवंशी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *