नागपूर समाचार : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज मंगळवारी ४ जुलैला सायंकाळी ७ वाजता नागपुरात आगमन झाले.५ जुलै रोजी सकाळी गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ तसेच कोराडीतील सांस्कृतिक केंद्राच्या उदघाटन सोहळ्याला राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपतिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच नागपूर दौरा आहे.







