- Breaking News, नागपुर समाचार, शिक्षा

नागपूर समाचार : श्री राजेंद्र हायस्कूल येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

नागपूर समाचार : दि. एम. पी. एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित श्री राजेंद्र हायस्कूल आणि उच्च माध्यमिक विद्यालय, नंदनवन नागपूर येथे एच.एस.सी परीक्षा 2022-23 यात उल्लेखनीय यश प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

विज्ञान शाखेत 95.33 टक्के गुण घेत तपेश बघेले या विद्यार्थ्याने प्रथम स्थान पटकाविले तर 94.50% घेऊन विनय तितरमारे हा द्वितीय स्थानी आला. शंतनू राजूरकर, मंथन खरवडे, श्वेता फगणे, वृंदा ब्रम्हे, पार्थ खरवडे व राधिका नेरकर या विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय यश मिळविले. वाणिज्य शाखेतून 87% गुण घेत शादाब शेख हा विद्यार्थी प्रथम तर ८६.६७% घेत पियुष तिजारे हा विद्यार्थी द्वितीय स्थानी आला. लावण्य उके, नाझिया शेख, अभिषेक वाघमारे, सरिना दुधनकर, रिमझिम विश्वकर्मा या विद्यार्थ्यांनी देखील उत्तम यश मिळविले.

सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा संस्थेचे सचिव श्री मोहन नाहातकर, सहसचिव श्री विवेक नाहातकर, मुख्याध्यापिका सौ नीता जाधव, पर्यवेक्षिका रंजना चौधरी, पर्यवेक्षिका डॉ. स्मिता नाहातकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी यशाचे श्रेय शाळेतील अधिकारी वर्ग, शिक्षक व पालकांना दिले. शाळेतील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकवर्ग यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कौतुक सोहळा संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *