- Breaking News, PRESS CONFERENCE, नागपुर समाचार

नागपुर समाचार : निरोगी फुफ्फुस निरोगी जीवन: जागतिक अस्थमा/दमा दिन अस्थमाच्या/दम्याच्या व्यवस्थापनात कंट्रोलर थेरपीचे महत्त्व अधोरेखित करतो

नागपुर समाचार : फुफ्फुस हा सर्वात नाजूक आणि बऱ्याच आजारांना अधिक प्रवण असलेला अवयव मानला जातो. जागतिक अस्थमा/दमा दिवस 2 मे 2023, फुफ्फुसाचे आरोग्य, फुफ्फुसाच्या आजारांचे वाढते प्रमाण आणि या आजारांवरील उपचारांच्या अपुर्या गरजा पूर्ण करण्याची आठवण करून देतो. अस्थमा/दमा हा एक तीव्र दाहक रोग आहे ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो आणि त्याची तीव्रता वाढली तर जीवघेणा ठरू शकतो. जगभरात सुमारे 339 दशलक्ष लोक अस्थमाने/दम्याने ग्रस्त आहेत आणि ही संख्या वाढतेच आहे.

अस्थमा/दम्याने जगात होणाऱ्या मृत्यूंपैकी 42% पेक्षा जास्त मृत्यू भारतात होतात आणि भारतातील एक तृतीयांश अस्थमाच्या/दम्याच्या रुग्णांनी उपचारासाठी इनहेलरचा वापर केल्याची नोंद आहे. डॉ. विनीत निरंजने यांच्या मते, अस्थमाच्या/दम्याच्या व्यवस्थापनामध्ये खरंतर इनहेल्ड कॉर्टिकोस्टिरॉईड्सह नियमित उपचारांचा समावेश असावा. तसेच, सध्या, भारतातील अस्थमाचे/दम्याचे वाढते प्रमाण आणि त्यामुळे होणारे मृत्यू हे योग्य इनहेलर तंत्राचा अभाव, शॉर्ट-अॅक्टिंग ब्रॉन्कोडायलेटर्सचा (सामान्यतः “रिलीव्हर इनहेलरचा आवश्यक वापर” म्हणून ओळखले जाते) जास्त वापर आणि अस्थमाच्या/दम्याच्या दैनंदिन उपचारांसाठी इनहेल्ड कॉर्टिकोस्टिरॉईड्सच्या कमी वापरामुळे आहे. अस्थमासाठी/दम्यासाठी जागतिक मार्गदर्शक तत्त्वांचा हेतू आवश्यक त्या रिलीव्हर औषधांचा वापर कमी करून अस्थमाचे/दम्याचे प्रमाण कमी करणे आणि अस्थमाच्या/दम्याच्या दैनंदिन उपचारांसाठी नियमित कंट्रोलर थेरपी वापरण्याची शिफारस करणे आहे. तसेच, अस्थमाची/दम्याची सुरुवातीची चिन्हे आणि लक्षणे ओळखणे आणि त्वरीत वैद्यकीय मदत घेणे महत्वाचे आहे.

योग्य औषधोपचार, नियमित तपासणी आणि जीवनशैलीत बदल करून अस्थमा/दमा प्रभावीपणे नियंत्रित केला जाऊ शकतो. जागतिक अस्थमा/दमा दिन 2023 ची थीम “सर्वांसाठी अस्थमाची/दम्याची काळजी” ही आहे, ज्यात प्रभावी, गुणवत्ता-आश्वासित औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आरोग्य सेवा नेत्यांना प्रोत्साहित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. “सर्वांसाठी अस्थमाची/दम्याची काळजी” हा संदेश सर्व संसाधन देशांमध्ये प्रभावी अस्थमा/दमा व्यवस्थापन कार्यक्रमांच्या विकास आणि अंमलबजावणीला प्रोत्साहन देतो. 

डॉ. विक्रांत देशमुख म्हणाले, जागतिक अस्थमा/दमा दिन 2023 च्या माध्यमातून, अस्थमाची/दम्याची लक्षणे, निदान आणि

उपचाराच्या पर्यायांबद्दल जागरूकता वाढवूया. रुग्णांना त्यांच्या अस्थमाचे/दम्याचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्याच्या महत्त्वाबद्दल आणि त्यांच्या आरोग्य सेवा प्रदात्यांसोबत काम करून सर्वसमावेशक

अस्थमाचा/दम्याचा अॅक्शनप्लॅन तयार करण्याचे शिक्षण देऊया. डॉ. विनीत निरंजने आणि डॉ. विक्रांत देशमुख प्रत्येकाला अस्थमा/दमा गांभीर्याने घेण्याचे आणि त्याची कोणतीही लक्षणे आढळल्यास वैद्यकीय मदत घेण्याचे आवाहन करतात. आपल्यासोबत आपल्या सभोवतालच्या लोकांना अस्थमा/दमा, त्याचे ट्रिगर आणि त्याचे प्रभावीपणे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल शिक्षण देणे आवश्यक आहे. या जागतिक अस्थमा/दमा दिनाचा उपयोग जागरुकता वाढवण्यासाठी, अस्थमा शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जगभरातील अस्थमा/दमा असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी करूया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *