काचबिंदू वर जनजागृतीपर सांगीतिक कार्यक्रम
नागपूर समाचार : ओप्थॅल्मोलॉजिकल सोसायटी नागपूर (ओएसएन), इंडियन मेडीकल असोसिएशन नागपूर शाखा आणि कमलाबाई देशपांडे मेमोरिअल ट्रस्ट यांच्या संयुक्तवतीने व ऋतुराज नागपूर प्रस्तुत ‘नझरों… के दिल… से!’ हा डोळ्यांचे विकार व काचबिंदूबद्दल सखोल सांगीतिक चर्चेचा कार्यक्रम शनिवार, दि.११ मार्च २०२३ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता आयएमए हॉल,नॉर्थ अंबाझरी रोड येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची संकल्पना मुग्धा तापस यांची असून निवेदन किशोर गलांडे व आसावरी गलांडे- देशपांडे करणार आहेत.
ओप्थॅल्मोलॉजिकल सोसायटीच्यावतीने काचबिंदू जनजागृती आठवडा साजरा केला जात असून त्या अनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सर्व नेत्ररोगतज्ज्ञ डॉ.अमर भास्करे, डॉ. गुंजन देशपांडे, डॉ. विनय नांगिया, डॉ. आशिष थुल, डॉ. शिल्पा तिवारी, डॉ. नेहा देशपांडे सहभागी होणार आहेत. प्रसिद्ध गायक गुणवंत घटवाई ,अनुजा मेंघळ- सावजी व मुकुल पांडे विविध गीते सादर करणार असून त्यांना गोविंद गडीकर, मोरेश्वर दहासहस्त्र, विशाल दहासहस्त्र, मुग्धा तापस वाद्यसंगत करतील. हा कार्यक्रम निःशुल्क असून नागरिकांनी मोठ्या संख्येने संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.