- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते ‘वार’ यंत्राचे लोकार्पण संपन्न

कान्होलीबारा येथील आर्यभट्ट एस्ट्रोनॉमी पार्कमध्ये आणखी एका यंत्राचा जिज्ञासूंना घेता येईल लाभ

नागपूर समाचार : आर्यभट्ट एस्ट्रोनॉमी पार्क,श्री क्षेत्र चक्रवर्ती नगरी चौकी कान्होलीबारा हिंगणा नागपूर येथे, नवनिर्मित ‘वार’ यंत्राचे उद्घाटन सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते आज (गुरुवार) रोजी संपन्न झाले.

याप्रसंगी प्रामुख्याने कोठा जयपाल रेड्डी, उद्योजक व समाजसेवक करिम नगर तेलांगना,बिरदविंदर सिंग शम्मी सिद्धु पटियाला, डॉ प्रमोद पडोले डायरेक्टर VNIT, प्रोफेसर दिलिप पेशवे व त्यांचे या यन्त्रावर काम करणारे सहकारी प्रोफेसर टिम प्रामुख्याने उपस्थित होती.

श्री क्षेत्र चक्रवर्ती नगरी चौकी कान्होलीबारा येथे आर्यभट्ट एस्ट्रोनॉमी पार्क व श्री शनिशक्तीपीठाची स्थापना 3 जून 2019 साली करण्यात आली आहे.या पूर्वी या ठिकाणी प्रामुख्याने मध्य भारतातील सर्वात मोठे सूर्य घड्याळ (सन डायल) यासोबतच ३३०० किलो वजनाचे भारतातील सर्वात मोठे चार फूट रुंद,आणि चार फूट लांब बसाल्ट दगडावर कोरलेले श्रीयंत्र,अचूक कालनिर्णय दाखवणारे भारतातील पहीले तिथी यंत्र व नक्षत्र यंत्र यांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

पवित्र व स्कंध पुराणात वर्णित गुरु बृहस्पती परिक्षेत्रात नव्याने ‘वार यंत्राची’ निर्मिती करण्यात आली असून त्याचे लोकापर्ण सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते संपन्न झाले.

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागपुर व वर्धा जील्यातिल अनेक नामवंत उपस्थित होते, बेंगलुरु वरुन आलेल्या दक्षिण भारतीय वेदाचार्यानि सरसंघचालक मोहन भागवत यांचे वेदमन्त्रांनी स्वागत केले, याप्रसंगी सरसंघचालक व उपस्थितांना आचार्य भूपेश गाडगे यांनी सर्व यंत्रांची माहिती विस्ताराने सांगीतली . या यंत्रांचा जिज्ञासूंनी लाभ घेण्याचे आवाहन सुध्दा त्यांनी केले.

हे यंत्र वैदिक खगोलशास्त्रांच्या आधारे निर्मित केले असून, भारतामध्ये जंतरमंतर जयपूर येथे राजा जयसिंग यांनी कालगणनेची जी अचूक वेधशाळा (ऑब्जर्वेटरी) निर्माण केली आहे त्यानंतरच्या काळात अश्‍या वेधशाळांचे निर्माण भारतात फार कमी प्रमाणात झाले व भारतीय खगोल विज्ञानाचे संशोधने अजुनहि देश व परदेशात पोहचविण्याची गरज आहे असे उद्गार याप्रसंगी सरसंघचालक मोहन भागवतजी यांनी केले.

नागपुर येथील रमण विज्ञान केंद्रात जे शोध दाखविण्यात येतात ते आईंस्टाईन किवा न्यूटनचे शोध दाखविले जातात मात्र कान्होलीबारा येथील आर्यभट्ट एस्ट्रोनॉमी पार्कमध्ये वैदिक विज्ञानाच्या आधारावर आपल्या ऋषि मुनींनी हजारो वर्षांपूर्वी जे संशोधन केले,जे शोध केले,ते दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

प्रामुख्याने जे ‘वार‘ यंत्र आहे, रविवार,सोमवार,मंगळवार इत्यादी वारांची माहिती सर्वांना आहे परंतू त्यांचे विज्ञान,ते आले कूठून याची माहिती सांगितली जात नाही किवा अभ्यासक्रमात देखील शिकवली जात नाही.सर्व जगात अमेरिका,युरोप,चायना इत्यादी देशात हे अगाध व प्रगाढ ज्ञान जसेच्या तसे वापरल्या जातं परंतू या मागील वैज्ञानिक भूमिका काय आहे,हे लोकांच्या समोर येण्यासाठी ‘वार यंत्रांची’निर्मिती करण्यात आली आहे.

याच प्रमाणे येथील जे ‘तिथी’ यंत्र आहे ते देखील कालगणनेसाठी सर्वाधिक अचूक असे आहे,हे यंत्र चंद्राच्या भ्रमणानुसार स्थापित करण्यात आले आहे.चंद्राच्या अाधारावर जी कालगनणेची रचना आपल्या ऋषि मुनींनी केली आहे,त्या बद्दलची माहिती जिज्ञासूंना व्हावी या उद्देशाने या ‘तिथी’ यंत्राची स्थापना करण्यात आली आहे.

थोडक्यात वैदांतिक विज्ञान लोकां पुढे यावे ही महत्वाची बाजू लक्षात घेऊनच, कान्होली बारा येथील आर्यभट्ट एस्ट्रोनॉमी पार्क तयार करण्यात आले आहे.

डॉ. प्रमोद पडोले, डायरेक्टर VNIT व डॉ दिलीप पेशवे व या यन्त्रावर काम करणारी त्यांची टीम यांनी मान्यवरांना वैदिक खगोल विज्ञानाची महत्ता याप्रसंगी समजवुन सांगीतली, तसेच तिथी यन्त्र रोजच्या चन्द्राच्या भ्रमणानुसार कसे कार्य करणार याची प्रणाली व हां सर्व उपक्रम स्वंयचलीत करण्याकरीता computer, Mechanical, electrical प्रोफेसर यांवर संशोधन करीत असल्याचे सांगीतले.

या कार्यक्रमाला यशस्वी करण्या करीता प्रामुख्याने आचार्य भूपेश गाडगे,डॉ.अनिल वैद्य,आचार्य पूजा गाडगे,रामदास फूलझले ,रमेश मिश्रा,देवेंद्र दायरे, बालकनाथ केपी व सहयोगी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *