- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : सी पी अँड बेरार महाविद्यालयाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांची साखर कारखान्याला भेट

नागपूर समाचार : सी.पी. अँड बेरार महाविद्यालय तुळशीबाग येथील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी मानस लिमिटेडच्या देव्हाडा येथील युनिट ४ वैनगंगा साखर कारखाना येथे नुकतीच प्रात्यक्षिक भेट दिली. एका उद्योगाचे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी मिळणारे योगदान विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवले.

या उद्योगामुळे परिसरातील जवळपास ३००० लोकांना रोजगार प्राप्त झाला आहे, रस्त्यांचा विकास झाला आहे, वीज पाणी व इतर सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. मानस लिमिटेड चे एकूण ७ युनिट आहेत आणि हे सर्व देशाच्या विकासात हातभार लावत आहेत.

उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत ही भेट घेण्यात आली. विद्यार्थ्यांना व्यवस्थापक श्री. विजय राऊत यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ मिलिंद बारहाते यांच्या मार्गदर्शनात या भेटीचे समन्वयन डॉ मेधा कानेटकर व डॉ विनोद डोंगरवार यांनी केले. त्यांच्या सोबत डॉ प्रफुल्ल सुदामे, डॉ चेतन हिंगणिकर, प्रा वासुदेव नागपुरे, प्रा चंद्रकांत मडावी हे होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *