हाइलाइट…..
• नितीन मुकेश यांच्या सुरेल गीतांनी खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवाचा दूसरा दिवस गाजला
• ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, गाण्यांची केली फरमाईश
• केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती
नागपूर समाचार : ‘सुहाना सफर और ये मौसम हसी’, ‘कही दूर जब दिन ढल जाए’, ‘दुनिया बनानेवाले क्या तेरे’ अशी एकापेक्षाएक या अजरामर आणि सदाबहार गीतांची सुमधुर प्रस्तुती करून गायक नितीन मुकेश यांनी अक्षरशः सुवर्ण कळतील गीतांचा ‘सुहाना सफर’ श्रोत्यांना घडविला. खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती व ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या संयुक्तवतीने केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवाचे 3 ते 5 फेब्रुवारी 2023 दरम्यान कविवर्ष सुरेश भट सभागृह येथे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी नितीन मुकेश यांची गीतांची सांगीतिक पर्वणी नागपूरकरांना अनुभवता आली.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी महापौर अनिल सोले, राजू मिश्रा, लीलाताई चितळे, जयप्रकाश गुप्ता, बलबीर सिंग रेणु, प्रताप सिंग चौहान,सुधीर शर्मा, गीता चंद्रशेखर, माधुरी पाठमोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गायिका मानसी परांजपे यांनी नितीन मुकेश यांच्या समवेत त्यांना साथसंगत केली. यावेळी तांत्रिक आणि साथ सांगत करणाऱ्या संगीत चमुचा सत्कार नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला.
‘जो तुमको हो पसंद वही’ ‘चंदन सा बदन’, हा टूम बिलकुल वाईसी’ ‘ओहरे ताल मिले’ ‘कभी कभी मेरे दिल मे’, ‘एक प्यार का नगमा है’ अशी सदाबहार गाणी नितीन मुकेश यांनी सादर केली आणि श्रोत्यांची मने जिंकली. आपल्या आणि श्रोत्यांच्या मनातील गीते ऐकवल्या शिवाय आपण जाणार नसल्याचा पुनरुच्चार नितीन मुकेश यांनी कार्यक्रमादारम्यान केला. अभिजीत मुळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
या कार्यक्रमाच्या यशासाठी संस्थेचे पदाधिकारी आणि ट्रस्टी गिरीश गांधी,मार्गदर्शक दत्ता मेघे, ईतर ट्रस्टी सर्वश्री अविनाश घुशे, अशोक मानकर, सुधाकर कोहळे, नंदाताई जिचकार, प्रतापसिंह चव्हाण, प्रभाकर येवले, महमूद अंसारी, बाळ कुळकर्णी, निलेश खांडेकर, कमलेश राठी गौरीशंकर पाराशर, राजेश बागडी, सारंग गडकरी, भोलानाथ साहारे,बाळ कुळकर्णी, संजय गुळकरी, सुधीर शर्मा, जयप्रकाश गुप्ता,मधुप पांडे, पिंटू कायरकर, आशिष वांदिले, रेणुकाताई देशकर, किशोर पाटील, संदीप गवई, हाजी अब्दुल कादिर, दिलीप जाधव, ॲड नितिन तेलगोटे, विलास त्रिवेदी आणि मनिषा काशीकर यांनी विशेष प्रयत्न केले.
मुकेश यांची गाणी अजरामर – नितीन गडकरी
सुप्रसिद्ध गायक मुकेश यांचे हे जन्म शताब्दी वर्ष असून आपल्या विनंतीला मान देऊन मुकेश यांचे सुपुत्र नितीन मुकेश यांनी ही पाचवी नागपूर फेरी केली आहे असे नितीन गडकरी म्हणाले. प्रत्येक काळाची वेगळी गाणी वेगळ्या आठवणी असतात हा विचार केंद्रस्थानी ठेऊन ज्येष्ठ नागरिकांना पसंतीस पडतील अश्या कार्यक्रमांची आखणी या महोत्सवात करण्यात आली आहे. युवा पिढी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या आवडी निवडी वेगळ्या असतात. त्यामुळे कार्यक्रम देखील अवडीनुरूप असायला हवे असे ते म्हणाले. यावेळी मंचावर उपस्थित लीलाताई चितळे यांनी आणीबाणीच्या काळात केलेल्या सांघर्षाबद्दल देखील नितीन गडकरी यांनी उल्लेख केला. आपण आपल्या महाविद्यालयीन काळापासून मुकेश यांची गाणी आवडीने ऐकत असल्याचे देखील ते म्हणाले. याशिवाय मंचावर उपस्थित मान्यवरांच्या कार्याचे कौतुक त्यांनी केले.
‘नितीन मुकेश यांचा श्रोत्यांशी मराठीतून संवाद’ – मी मुंबई मध्ये जन्माला आलो. मी मराठी माणूस आहे असे सांगत नितीन मुकेश यांनी श्रोत्यांची आवडीची गाणी ऐकवली जातील याची खात्री दिली. तसेच सर्वांना गाणी आवडतात आहेत ना, शेवट पर्यन्त आवाज पोचतो आहे या बद्दल आपुलकीने चौकशी केली. आपल्या आवडीची गाणी मला कागदावर लिहून माझ्या कडे पोचवा असे म्हणून त्यांनी चोखंदळ श्रोत्यांना फर्माईशी गीतांच्या मागणीची धुरा दिली.
मुकेश यांनी केले गडकारींचे कौतुक –देशाचे नाव लौकिक संपूर्ण जगात होते आहे. त्यात नितीन गडकरी यांच्या उत्कृष्ट कामांचे मोलचे योगदान असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून नितीन मुकेश यांनी गडकरी यांच्या कार्याचा गौरव केला.