- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : डिजाईन शोकेस – 2023′ चे आज, 20 जानेवारी दरम्यान आयोजन; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्‍थ‍िती 

नागपूर चॅप्‍टरच्‍या रजत जयंती महोत्‍सवानिमित्‍त तीन दिवसीय आयोजन

नागपुर समाचार : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटेरियर डिझायनर्सची (आयआयआयडी) सुवर्ण जयंती व नागपूर रिजनल चॅप्‍टरच्‍या रजत जयंती महोत्‍सवानिमित्‍त नागपूर चॅप्‍टरच्‍यावतीने ‘डिझाईन शोकेस – 2023’ चे 20 ते 22 जानेवारी 2023 दरम्‍यान भव्‍य आयोजन करण्‍यात आले आहे.

चिटणवीस सेंटर, सिव्हिल लाईन्स येथे होणा-या या मध्य भारतातील सर्वात मोठ्या डिजाईन फेस्टिवलचे शुक्रवार, 20 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता पोलिस आयुक्‍त अमितेशकुमार यांच्‍या हस्‍ते उद्घाटन होईल. मुंबईचे प्रतिष्ठित आर्किटेक्ट रेझा काबुल प्रमुख वक्‍ते म्‍हणून कार्यक्रमाला उपस्‍थ‍ित राहणार आहेत.

दरम्यान 21 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी या डिझाईन महोत्‍सवाला भेट देतील व उपस्थितांना संबोधित करतील. या कार्यक्रमाला आयआयआयडी प्रेसिडेंटर इलेक्‍ट जिग्‍नेश मोडी, प्रेसिडेंट सरोश वाडिया व नागपूर चॅप्‍टरच्‍या अध्‍यक्ष अरुंधती साठे यांची उपस्‍थ‍िती राहणार आहे.

नागपुरात प्रथमच होत असलेल्‍या या तीन दिवसीय महोत्‍सवात देशभरातून 30 आर्किटेक्‍ट, डिझायनर, कलाकार सहभागी होणार असून देशभरातील 32 चॅप्‍टरचे अध्‍यक्ष उपस्‍थ‍ित राहतील. परिसंवाद, चर्चासत्र, कार्यशाळा, प्रात्‍यक्षिके, प्रदर्शनीचा त्‍यात समावेश राहणार आहे. 

प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या घराच्या डिझायनर अपूर्वा श्रॉफ यांच्‍यासह इन्‍फ्युएन्‍सर डिझायनर कोहेलिका कोहली, प्राची जैन यांचाही या महोत्‍सवात सहभाग राहणार आहे. वॉफलींग, ओरिगामी, विद्यार्थ्यांसाठी पेन्सिल सिड कार्यशाळा, डीझायनरच्या प्रोजेक्ट वर आधारित जुगलबंदी, नेचर वॉक असे शैक्षणिक व मनोरंजनाचे कार्यक्रमही आखण्‍यात आले आहेत. या संधीचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन नागपूर चॅप्‍टर व आयोजन समितीच्‍या अध्‍यक्ष अरुंधती साठे, सचिव आरती सहाणे, संयोजक प्रार्थना नांगिया, सह-संयोजक भूषण जेसवानी, कोषाध्यक्ष सीमा अग्रवाल यांनी केले आहे. महोत्सवाच्या सफलतेसाठी चेअरमन इलेक्ट हिमांशू ठक्कर, उपाध्यक्ष ट्रेड हर्षल चरडे, अनिकेत खोडवे, तृप्ती अग्रवाल, जवाहर तिडके, अभिलाषा शर्मा, गौरव मोटघरे, विशाखा चावला, दिलीप हिंगे यांचे सहकार्य लाभत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *