- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : यशस्वी जीवनाचा मूलमंत्र ”शिक्षण” – पंडित शंकरप्रसादजी अग्निहोत्री

नागपुर समाचार : मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास हा त्याच्या शिक्षणावरच अवलंबून असतो तो जितका शिक्षणामध्ये ज्ञान अर्जित करतो करतो तो तितकाच यशाच्या शिखरावर जाऊन बसतो शिक्षणाची दिशा ही माणसाच्या संपुर्ण विकासासाठी आणि त्याच्या मुलभूत अधिकारांसाठी महत्वाची असते. देशाला आर्थिक महासत्ता आणि प्रभावी राष्ट्र बनवण्यात युवक महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात त्यामुळेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणाऱ्या शिक्षणाची आता देशाला गरज आहे .असे प्रतिपादन पंडित शंकरप्रसादजी अग्निहोत्री यांनी केले ते शिक्षण महाविद्यालया द्वारा आयोजित इंडक्शन प्रोग्राम मध्ये बोलत होते.

यावेळी आपल्याला प्रस्तावनेत प्राचार्य डॉ.पुनसे म्हणाले की शिक्षण घेण्याचा उद्देश केवळ अर्थार्जन असेल तर ते निरर्थक आहे.शिक्षणाचा उपयोग समाजहिताकरिता होणे आवश्यक आहे.

आपले मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ.कोठारे म्हणाले की,विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन हा वैज्ञानिक व क्रियात्मक असला पाहिजे.चिकित्सक वृतीला कठोर परिश्रमाची साथ दिल्यास यशोशिखर गाठण्यापासून कोणीही शकणार नाही.

आपले विचार व्यक्ती करताना प्राचार्य डॉ.जंगमवार म्हणाले की,यशस्वी जीवनाकरीता सप्तसूत्री गुणधर्माचे पालन करणे गरजेचे ती म्हणजे स्वतः वरचा विश्वास त्याला कर्तव्याची जोड,शिस्त व कठोर परिश्रम, उत्तरदायित्वाची जाणीव,योग्य दिशा व दृष्टिकोनाला त्यागाची झालर असणे आवश्यक आहे.तरच आपण जीवनात यशस्वी होऊ.

आभार प्रदर्शन तिवारी मॅडम यांनी केले. यावेळी प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *