- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : डॉ. मनोहरजी ठुब्रीकर साहेब आणि सुधाताई ठुब्रीकर (अमेरिका) यांचे नागपूर नगरीत आगमन

नागपूर समाचार : परमात्मा एक सेवक मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे चिरंजीव श्री. डॉ. मनोहरजी ठुब्रीकर साहेब आणि सुधाताई ठुब्रीकर (अमेरिका) यांचे आज दिनांक ०७/०१/२०२३ रोजी नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले.

या प्रसंगी परमात्मा एक परमात्मा सेवक मंडळ टिमकी येथील कार्यकर्ते द्वारा श्री. डॉ. मनोहरजी ठुब्रीकर आणि सुधाताई ठुब्रीकर (अमेरिका) यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

तसेच बाबांचे उगमस्थान टिमकी येथे सुद्धा सेवक आणि सेविका द्वारे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने सेवक आणि सेविका प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच “बाबा जुमदेवजी अमर रहे” आणि “जब तक सुरज चांद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा” घोषणा करण्यात आल्या त्यामुळे संपूर्ण टिमकी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

श्री. डॉ. मनोहरजी ठुब्रिकर यांना इंजिनीअरिंग मध्ये अनेक प्रमाणपत्रांसह सन्मानित करण्यात आले आहे. आज मनोहरजी ठुब्रिकर जगातील पहिल्या नऊ शास्त्रज्ञांपैकी सातवे नामांकित वैद्यकीय वैज्ञानिक आहेत.

यावेळी रमेश ठुब्रीकर, विठाताई ठुब्रीकर, राहुल ठुब्रीकर, सुमित ठुब्रीकर, स्वप्नील ठुब्रीकर, उत्कर्षा ठुब्रीकर, नरेंद्र वंजारी, विक्की डोईफोडे, युवराज नागपुरे, आशिष आकोटकर, रवि कुंभारे, पंकज जिचकार इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.

(पत्रकार : वासुदेव पोटभरे‌)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *