- Breaking News, नागपुर समाचार, मनोरंजन

नागपुर समाचार : रसिका… तुझ्याचसाठी’ संगीतमय कार्यक्रम 7 जानेवारी रोजी 

हिंदी-मराठी सुरेल गीतांची प्रस्तुती करण्यात येणार

नागपूर समाचार : ऋतुरंग संगीत विद्यालय प्रस्तुत ‘रसिका… तुझ्याचसाठी’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी 7 जानेवारी 2023 रोजी संध्याकाळी 6.30 वाजता सायंटिफीक सभागृह, आठरस्ता चौक लक्ष्मी नगर नागपूर येथे करण्यात आले आहे. यावेळी हिंदी-मराठी सुरेल गीतांची प्रस्तुती करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे संगीत मार्गदर्शक गुणवंत घटवाई आहेत तर प्रभा खांडेकर, स्वाती नामजोशी, अनुराधा बापट, हेमांगी खेडकर, वैशाली सांबरे, स्मिता उदगिरकर, स्नेहल प्रतापे, माधवी बांडे, रंजना शर्मा, संगीता मदनकर, अपर्णा देशपांडे, ज्योती देशपांडे, धनश्री जोशी आणि अंजली केतकर हे गायक गीते सादर करतील. श्रीकांत पिसे, पंकज यादव, ऋग्वेद पांडे, अक्षय हरले, मुग्धा तपास यावेळी साथसंगत करतील. आर्या घटवाई कार्यक्रमाचे निवेदन करतील. या निःशुल्क कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *