- Breaking News, नागपुर समाचार, विदर्भ

नागपुर समाचार : जैन मुनी अक्षय ऋषिजी महाराजांचे चंद्रपूर नगरीत जोरदार स्वागत

शहरात निघाली पायी मिरवणुक; नागरिकांनी घेतला दर्शन व प्रवचनाचा लाभ

चंद्रपूर समाचार : श्रमण संघिय उप प्रवर्तक आत्मरासिक परम पूज्य अक्षय ऋषींजी महाराज साहेब, आयंबील तप आराधक परम पूज्य अमृत ऋषींजी महाराज साहेब, सेवाभावी नवदीक्षित परम पूज्य गीतार्थ ऋषींजी महाराज साहेब, आदी ठांना 3 ह्यांनी आज दिनांक 27 डिसेंबर रोजी चंद्रपूर महानगरात मंगल प्रवेश केला. यवतमाळ येथील चातुर्मासानंतर ते पायी मार्गक्रमण करत पहिल्यांदाच चंद्रपूर शहरात आले हे विशेष. सकाळी पडोली, विद्या निकेतन शाळा, जटपुरा गेट मार्गे भाविकांच्या प्रचंड उपस्थितीत मंगल जयघोषात त्यांनी जैन भवन प्रवेश केला ह्यावेळी भगवान महविरांच्या मंगल वचनांचा जयघोष करून भक्तांनी त्यांचे स्वागत केले.

आगमनानंतर परम पूज्य अक्षय ऋषींजी महाराज साहेबांनी आपल्या मधुर वाणीतून रसाळ प्रवचन केले. आपल्या प्रवचनात अक्षय ऋषींजी महाराज साहेबांनी मनुष्य श्रद्धेच्या बळावर अशक्य कोटीतील अडचणींवर मात करून मार्ग काढू शकतो व कुठलीही गोष्ट शक्य करू शकतो हे सप्रमाण सांगितले. जिवनात श्रद्धेला प्रचंड महत्व आहे. श्रद्धा ही भक्तालाही ही देव बनवू शकते त्याच प्रमाणे सामान्य व्यक्तीला परमेश्वराचा प्रिय बनवु शकते, श्रद्धाच मानवाला ही महामानव बनवते, आणि पुरुषाला ही महापुरुष बनविते, जेव्हा श्रद्धा असेल तेव्हा कोणते ही कार्य लवकरात लवकर होते. व कठीण कामातही आनंद मिळतो असे प्रतिपादन केले.

आगामी नाविन वर्षाच्या सुरुवातीलाच 1 जानेवारी 2023 रोजी आयोजित विदर्भ स्तरीय संमेलनात महिलांना मानवी जीवन व पारिवारिक नाते व त्यातील संबंध ह्यावर संस्कार देण्यात येणार आहे हे विशेष.

उपरोक्त तीनही तपस्वी संतांच्या अशिर्वचनांचा लाभ व्हावा, नागरिकांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल व्हावा, नव्या पिढीवर सुयोग्य संस्कार व्हावे तसेच चारित्र्यवान, निरोगी व निकोप समाजाचे निर्माण तथा संवर्धन व्हावे ह्यासाठी जैन भवनात दररोज अक्षय ऋषीजी महाराज साहेबांसह अमृत ऋषींजी महाराज व गीतार्थ ऋषींजी महाराज सकाळी 9 वाजता प्रवचन, दुपारी 2 वाजता महिला चर्चा, रात्री 8 वाजता नवयुवकांसाठी धर्म चर्चा करणार आहेत. संतांच्या ह्या अमृत वचनांचा जैन भवन येथे उपस्थित राहुन भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन नरपत चंद भंडारी, सुधीर बाबु बांठीया, डॉ. अशोक बोथरा, दीपक पारख, डॉ. आनंद बैद, जितेंद्र चोरडिया, रवींद्र बैद, गौतम कोठारी, राजेश डागा, जितेंद्र जोगड, तुषार डगली, विशाल मुथा,आनंद तालेरा, त्रिशूल बंब, देवेंद्र सुराणा, जितेंद्र सुराणा, प्रतीक बोथरा, चेतन झांबड, राजा पारख, रुचित सुराणा, प्रतीक सकलेचा, गुंजन चोरडिया, सरला बोथरा, शोभना संगवी, सरिता चोरडिया, कल्पना लाठीया, ज्योती पारख, राजश्री मूथा हयांचेसह सकल जैन समाजाने केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *