- Breaking News, खेलकुद , नागपुर समाचार

नागपुर समाचार : महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धेनिमित्त 30 डिसेंबरला नागपूरातून निघणार क्रीडा ज्योत

शहरातून काढण्यात येणाऱ्या क्रीडा ज्योतीच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली

नागपुर समाचार : महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून जिल्ह्यात या स्पर्धेतील बॅडमिंटन, हॅण्डबॉल, नेट बॉल व सेपक टेकरा या चार क्रीडा स्पर्धाचे 2 ते 8 जानेवारी 2023 या दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या आयोजनानिमित्त संपूर्ण राज्यात वातावरण निर्मिती होणे आवश्यक आहे . स्पर्धेच्या आयोजनाची भव्यता जनसामान्यांना ज्ञात होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातील प्रत्येकी 9 विभागातून भव्यतेने क्रीडा ज्योत रॅलीचे आयोजन 30 डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बचत भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी 30 डिसेंबर रोजी सकाळी महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धेनिमित्त नागपूर शहरातून काढण्यात येणाऱ्या क्रीडा ज्योतीच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. ही रॅली विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथून निघून काटोल नाका, वेस्ट हायकोर्ट रोड, पोलीस कमिश्नर कार्यालय, लॉ कॉलेज, लेडीज कॉलेज, शंकर नगर, लक्ष्मी नगर,बजाज चौक,दिक्षाभूमी व अजनी याद्वारे समृध्दी मार्गाने पुणेकडे रवाना होईल, या दरम्यान ही ज्योत सात जिल्ह्यातून जाणार असून वर्धा जिल्ह्यात जिल्हा क्रीडा अधिकारी वर्धाच्या वतीने क्रीडा ज्योतीचे स्वागत करण्यात येईल.

जनमानसात महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धेबाबत जागृती व्हावी तसेच मोबाईल क्रांतीमुळे दिवसेंदिवस क्रीडा स्पर्धाकडे विद्यार्थ्यांमध्ये जो दुरावा निर्माण झालेला आहे, तो दुर व्हावा यासाठी या क्रीडा ज्योतीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विद्यार्थ्यांचे लेझीम पथक, तसेच शिवछत्रपती अवार्डीची बाईक रॅली, पोलीस बँड पथक राहणार आहेत. रॅलीत मोठया संख्येने क्रीडा प्रेमी रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्‍यात आले. खेडाळूंना नाश्ता व पाणी सुविधा, त्याचबरोबर आरोग्य सुविधेसाठी ॲम्ब्युलंस उपलब्ध करण्यात येणार आहे.  

निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, सहाय्यक पोलीस आयुक्त विलास सोनवणे, पोलीस निरिक्षक विनय सिंग, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी छात्रक, शिव छत्रपती पुरस्कार अवार्डी योगेंद्र पांडे, मिनाक्षी निर्वाण, नेट बॉल संघटनेचे विपीन कंदर, अमीत कनवर,ललीत सुर्यवंशी, हँडबॉल संघटनेचे सुनील भोतमांगे, जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अमंत आपटे, आदित्य गलांडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *