- Breaking News, PRESS CONFERENCE, नागपुर समाचार, शीत सत्र २०२३

नागपुर समाचार : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

उद्यापासून राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनला सुरुवात होणार

नागपुर समाचार : नागपूरमध्ये उद्यापासून राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनला सुरुवात होणार आहे. सर्व क्षेत्रात राज्याच्या हिताचा कारभार करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचं सांगत विरोधकांनी आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारच्या कारभारावर टीका करत चहापानावर बहिष्कार घालत असल्याचं सांगितलं. सीमावाद, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न तसंच विदर्भाचा अनुशेष भरून काढणे या हाताळण्यात हे सरकार अपयशी ठरलं आहे, असं ते म्हणाले.

कर्नाटक महाराष्ट्र सीमावादात महाराष्ट्राची बाजू मांडण्यात सरकार अपयशी ठरलं तसंच या प्रश्नावर सत्ताधारी कोणताही तोडगा काढू शकले नाहीत असा आरोप अजित पवार यांनी यावेळी केला. हे अधिवेशन तीन आठवड्यांचं घ्यावं अशी मागणीही त्यांनी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *