- Breaking News, PRESS CONFERENCE, नागपुर समाचार

नागपुर समाचार : भारतीय किसान संघ द्वारा 19 डिसेंबरला दिल्ली येथील रामलीला मदानावर “किसान गर्जना रॅली”

‘देश के हम भंडार भरेंगे लेकिन कीमत पुरी लेंगे’ हा भारतीय किसान संघाचा नारा

नागपूर : भारतीय किसान संघ द्वारा 19 डिसेंबरला दिल्लीच्या रामलीला मैदानात किसान गर्जना रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. नागपुरात पत्रकार परिषदेत भारतीय किसान संघाचे विदर्भाचे प्रचार प्रमुख दिलीप ठाकरे यांनी सांगितले. पूर्ण देशाच्या 534 जिल्हयांमधून लाखोंच्या संख्येने शेतकरी रामलीला मैदानात दिल्ली येथे दिनांक 19 डिसेंबरला किसान गर्जना रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. देशातील शेतकऱ्यांनी भरपूर उत्पादन करून देशाची खाद्य अन्न सुरक्षा निश्चित केली आहे परंतु शेतकऱ्यांची स्थिती जशीच्या तशीच आहे.

‘देश के हम भंडार भरेंगे लेकिन कीमत पुरी लेंगे’ हा भारतीय किसान संघाचा नारा असून आज देश खाद्य अन्नाच्या बाबतीत आत्मनिर्भर झालेला आहे आम्ही विदेशात खाद्य अन्न निर्यात करीत आहोत परंतु, शेतकरी जे पीक उत्पादित करतोय त्याच्या उत्पादित पिकाला उत्पादन खर्चावर आधारित लाभकारी मूल्य अजूनही मिळत नाही. आज शेतकऱ्यांच्या विभिन्न मागण्यासाठी भारतीय किसान संघाचे दिल्ली येथील रामलीला मैदानात किसान गर्जना रॅली आयोजित करत आहेत. लाखोच्या संख्येने किसान गर्जना रॅली सहभागी होण्याचे भारतीय किसान संघाने पत्रकार परिषदेत म्हणाले. 

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या……

  1. उत्पादन खर्चावर आधारित लाभकारी भाव देण्यात यावे.
  2. कृषी आदान / वस्तू वर लागणारी जीएसटी समाप्त करण्यात यावी. 
  3. किसान सन्मान निधीच्या राशीमध्ये वाढ करण्यात यावी.
  4. आयात निर्यात धोरण किसान हिताचे असावे
  5. जीएम मस्टर्ड सरसो ला परवानगी देऊ नये

या पत्र परिषदेला भारतीय किसान संघाचे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य श्री नानाजी आखरे तसेच विदर्भ प्रांत अध्यक्ष राजेश राणे, विदर्भ प्रांत प्रचार प्रमुख श्री दिलीप ठाकरे, प्रांत कार्यालय मंत्री श्री दिलीप पाटील, जिल्हा अध्यक्ष सुरेखा गुडधे व जिल्हा मंत्री रामरावजी घोंगे, जिल्हा उपाध्यक्ष श्री अजय बोंद्रे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *