- Breaking News, नागपुर समाचार, सामाजिक 

नागपुर समाचार : स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव देणारेउत्तम व्यासपीठ – आमदार ना. गो. गाणार

मानवता शाळेचा वार्षिक क्रिडा महोत्सव व स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

नागपुर समाचार : विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन हे उत्तम व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन आमदार ना. गो. गाणार यांनी केले. कुंजीलालपेठ, रामेश्वरी मार्गावरील नव-युवक एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित मानवता प्राथमिक, हायस्कूल व काॅव्हेंट शाळेच्या वार्षिक क्रिडा महोत्सव आणि स्नेहसंमेलन समारोप प्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी अध्यक्षस्थानी प्रख्यात नेत्र तज्ज्ञ डाॅ. धमेंद्र कोसे तर मुख्य अतिथीमध्ये नव-युवक एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती विरजूलाबाई मेश्राम व संस्थेचे संचालक व सचिव संकेतजी डोंगरे यांची उपस्थिीत व्यासपीठावर होती. प्रमुख पाहुण्यांमध्ये पालक प्रतिनिधी सौ. सुजाता उके, मानवता हायस्कूलच्या मुख्यध्यापिका चारूशिला डोंगरे, प्राथमिक विभागाचे मुख्यध्यापक श्रावण जाधव, स्नेहसंमेलन अध्यक्ष किशोर गहूकरसह विद्यार्थी प्रतिनिधींची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरूवात उपस्थिती मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.

उद्घाटन प्रसंगी पुढे बोलताना आमदार ना. गो. गाणार म्हणाले की, विद्यार्थ्यांनी नेहमी सत्याची कास धरावी तसेच बंधू भावनेचे नाते विकसीत करावे. यामुळे विद्यार्थ्यांना जीवनात उच्च धेय्य बाळगाता येणार असा मोलाचे विचार आमदार ना. गो. गाणार यांनी विद्यार्थ्यांना दिले. तर अध्यक्षस्थानी असलेले डाॅ. धमेंद्र कोसे यांनी डोळयांच्या आजाराबाबत मुलांना मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.

यात पारंपारिक अस्सल मराठमोळ्या नृत्यांचा आविष्कार, आदिवासी नृत्य, कोळी नृत्य, नाटक, समुह नृत्य देशभक्तीपर गीते, लोकगीते, दमदार लावण्या व नविन गीतावर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरिकरण केले. लक्की बडवाईक, निहाल हातागडे या दोघांनी प्राणी पक्षांचे विविध आवाज काढून उपस्थितांची मने जिंकली. प्राथमिक विभागाने हस्तकला प्रदर्शनी तसेच हायस्कूल विभागाने रांगोळी स्पर्धेची प्रतिकृतींची पाहणी पाहुण्यांकडून करण्यात आले. संमेलनाचे प्रास्ताविक हायस्कूलच्या मुख्यध्यापिका चारूशिला डोंगरे यांनी केले. उद्घाटन सोहळयानंतर माजी नगरसेवक मनोज गावंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षिस वितरण सोहळा पार पडला.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सम्यक संकल्प संघाचे पदाधिकारी डाॅ. सरोज डांगे, सौ. सरोज आगलावे, धुपटे सर, धावडे सर, ताकसांडे सर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. क्रिडा महोत्सव व स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी नितीन हसबंड, श्री. प्रकाश नन्नावरे, सौ. वर्षा पाटील, श्री. घनश्याम बारापात्रे, श्री. मंगेश आदमने, सौ. माधुरी बेझलवार, सौ. सविता चांदेकर, कु. सपना डोळसकर, सौ. भावना खांडेकर, सौ. मंदाकीनी शेंडे आदी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री. प्रशांत शेळकी यांनी तर आभार सौ. रेखा हलमारे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *